शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत मोठा ट्विस्ट! अजितदादांनी 'पवार' नावाला मत द्या म्हटले; तिकडे शरद पवारांचा अर्ज मंजूर झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2024 16:33 IST

Sunetra Ajit pawar news: सेफर साईड म्हणून अजित पवारांनी आपला अर्जही लोकसभा निवडणुकीसाठी भरला होता. अजित पवारांचा हा अर्ज बाद ठरला आहे. तर सुनेत्रा पवारांचा अर्ज मंजूर झाला आहे.

बारामतीत केव्हा काय होईल याचा कोणीच नेम सांगू शकत नाही. कारण पवार विरुद्ध पवार अशी थेट लढत होऊ घातली आहे. गेल्यावेळी सुप्रिया सुळेंविरोधात लाखो मते पडली होती. आता पवारांच्या घरातील मुलगी आणि सून अशा दोन्ही एकमेकांविरोधात उभ्या ठाकल्या आहेत. सुळेंविरोधात अजित पवारांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना उभे केले आहे. त्यांच्या अर्जात काही दोष निघाला आणि अपात्र ठरला तर आपला दावा असावा म्हणून खुद्द अजित पवारांनी डमी अर्ज दाखल केला होता. यावरून रोहित पवारांनीही टीका केली होती. आता हा अर्जच बाद ठरला आहे. 

सेफर साईड म्हणून अजित पवारांनी आपला अर्जही लोकसभा निवडणुकीसाठी भरला होता. अजित पवारांचा हा अर्ज बाद ठरला आहे. तर सुनेत्रा पवारांचा अर्ज मंजूर झाला आहे. यामुळे बारामतीत सुळे वि. पवार अशी लढत होणार आहे. आता या आडनावावरूनही अजित पवारांनी वाद छेडला आहे. पवार आडणावाच्या उमेदवारालाच मतदान करा असे भर सभेत सांगत अजित पवारांनी सुळे या बाहेरच्या असल्याचे अप्रत्यक्षपणे सुचविले होते. यावर शरद पवारांनी देखील प्रत्तूत्तर दिले होते. यावरून ४० वर्षे झाली तरी सून पवारांची होत नाही का असा प्रश्न अजित पवारांनी उपस्थित केला होता. बारामतीत लोकसभेला सुप्रिया सुळेंना म्हणजेच शरद पवारांना तर विधानसभेला अजित पवारांना मत देणार असे बारामतीकरांचे म्हणणे आहे. हे खुद्द अजित पवारांनी देखील कबुल केलेले आहे. अशातच काही ओपिनिअन पोलमध्ये देखील सुनेत्रा पवारांचा पराभव होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामुळे ही निवडणूक चुरशीची ठरणार आहे. 

अजित पवार शरद पवारांवर कोणत्याही प्रकारचे आरोप करण्यात मागेपुढे पाहत नाहीत. यामुळे बारामतीकरांच्या मनात नेमके काय सुरु आहे, थोरल्या पवारांना मतदान करणार म्हणणारे बारामतीकर अजित पवारांच्या या प्रयत्नांना भुलतात का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. 

सुळेंचा अर्ज मंजूर, डमीचा नामंजूरशरद पवार गटाच्या सुप्रिया सुळेंचाही अर्ज मंजूर करण्यात आला असून त्यांच्यासोबत डमी अर्ज भरलेल्या सचिन दो़डके यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला आहे. दोडके यांनी अपक्ष अर्ज भरला होता. अजित पवारांकडून एकाच पक्षाचे दोन अर्ज आले होते. यामुळे सुनेत्रा यांचा अर्ज मंजूर करण्यात आला तर अजित दादांचा अर्ज नामंजूर करण्यात आला आहे. 

दुसरीकडे शरद राम पवार या रिक्षाचालकाने देखील अर्ज भरला होता. त्यांचा अर्जही मंजूर झाला आहे. यामुळे शरद पवार नावाचा उमेदवार बारामतीत असणार आहे. आता अजित पवारांच्या 'पवार' नावाला मतदान करण्याला मतदार काय प्रतिसाद देतात हे पाहणे निकालाच्या दिवशीच समजणार आहे. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारSunetra Pawarसुनेत्रा पवारbaramati-pcबारामतीNCPराष्ट्रवादी काँग्रेसmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४