शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळ कुटुंबीयांची चौकशीला टाळाटाळ?

By admin | Updated: February 24, 2015 04:31 IST

महाराष्ट्र सदनसह अनेक घोटाळ्यांप्रकरणी लाचलुपत प्रतिबंधक विभागाने(एसीबी) सुरू केलेल्या उघड चौकशीला भुजबळ कुटुंबीय गैरहजर राहण्याचे सत्र सुरू झाले आहे.

मुंबई : महाराष्ट्र सदनसह अनेक घोटाळ्यांप्रकरणी लाचलुपत प्रतिबंधक विभागाने(एसीबी) सुरू केलेल्या उघड चौकशीला भुजबळ कुटुंबीय गैरहजर राहण्याचे सत्र सुरू झाले आहे. कारण पंकज भुजबळ यांच्यापाठोपाठ समीर हेही चौकशीला गैरहजर होते. त्यामुळे भुजबळ कुटुंबीय ही चौकशी टाळण्याच्या प्रयत्नात तर नाहीत ना, अशी चर्चा सुरू झाली आहे.राष्ट्रवादीचे नेते व माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर यांच्यापासून एसीबीच्या विशेष तपास पथकाने(एसआयटी) उघड चौकशी सुरू केली. गेल्या आठवड्यात शुक्रवारी समीर यांची एसआयटीने एसीबीच्या वरळी येथील मुख्यालयात तब्बल तीन तास कसून चौकशी केली. त्यांचा जबाबही नोंदवून घेतला. मात्र चौकशी अपूर्ण राहिल्याने त्यांना सोमवारी मुख्यालयात हजर राहण्याची ताकीद देण्यात आली होती. मात्र आज दिवसभरात समीर एसीबीच्या मुख्यालयात फिरकलेच नाहीत.त्याआधी शनिवारी एसीबीने भुजबळ यांचे पुत्र पंकज यांना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र नाशिक येथे होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभ मेळाव्याच्या आयोजनाबाबत एका बैठकीचे निमित्त पुढे करून शनिवारी चौकशीसाठी उपस्थित राहता येणार नाही, असे एसआयटीला कळविले होते. त्यामुळे एसीबीने त्यांना पुढील तारीख दिली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या आठवड्यात पंकज यांची चौकशी होऊ शकते. (प्रतिनिधी)