पुन्हा बीड...! एका गावच्या सरपंचाची दुसऱ्या गावच्या उपसरपंचाला मारहाण; “माझ्या गावातील व्यक्तीची कामे तू का करतोस?” वरून भिडले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 17:17 IST2026-01-27T17:16:08+5:302026-01-27T17:17:20+5:30

Beed Panchayat Samiti fight : बीड पंचायत समिती कार्यालयात मौज गावचे सरपंच संदीप डावकर यांनी आंबेसावळीचे उपसरपंच धनंजय गुंदेकर यांना मारहाण केली. 'माझ्या गावची कामे का करतोस' यावरून झाला वाद. पाहा सविस्तर.

Beed again...! Sandeep Dawkar vs Dhananjay Gundekar Sarpanch of one village beats up deputy sarpanch of another village; “Why are you doing the work of a person from my village?” They clashed... | पुन्हा बीड...! एका गावच्या सरपंचाची दुसऱ्या गावच्या उपसरपंचाला मारहाण; “माझ्या गावातील व्यक्तीची कामे तू का करतोस?” वरून भिडले...

पुन्हा बीड...! एका गावच्या सरपंचाची दुसऱ्या गावच्या उपसरपंचाला मारहाण; “माझ्या गावातील व्यक्तीची कामे तू का करतोस?” वरून भिडले...

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजेच असताना पुन्हा एकदा बीडमध्ये पंचातय समितीतीच एका गावचा सरपंच आणि दुसऱ्या गावचा उपसरपंच यांच्यात हाणामारी झाल्याने खळबळ उडाली आहे. "माझ्या गावातील व्यक्तीची कामे तू का करतोस?" या कारणावरून मौज गावच्या सरपंचाने आंबेसावळी येथील उपसरपंचाला बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला असून प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

आंबेसावळी येथील उपसरपंच तथा बाजार समितीचे संचालक धनंजय गुंदेकर हे बीड तालुक्यातील मौज येथील एका शेतकऱ्याच्या विहिरीची फाईल घेऊन पंचायत समिती कार्यालयात गेले होते. यावेळी मौज गावचे सरपंच संदीप डावकर त्या ठिकाणी आले. "माझ्या गावातील व्यक्तीची कामे तू का करतोस?" असे म्हणत डावकर यांनी गुंदेकर यांच्याशी हुज्जत घातली. वादाचे रूपांतर पुढे शिवीगाळ आणि मारहाणीत झाले.

कार्यालयात तणावाचे वातावरण
पंचायत समितीच्या भर कार्यालयात हा गोंधळ सुरू असल्याने कर्मचारी आणि नागरिक भयभीत झाले होते. बराच वेळ या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. धनंजय गुंदेकर यांनी आरोप केला आहे की, "विहिरीच्या कामात मदत करत असताना संदीप डावकर यांनी अचानक अंगावर धावून येत मारहाण केली. संबंधित सरपंचाकडून माझ्या जीवाला धोका आहे."

गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
या मारहाणीप्रकरणी धनंजय गुंदेकर यांनी पोलिसांत धाव घेतली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सार्वजनिक कार्यालयात लोकप्रतिनिधींनीच अशा प्रकारे कायदा हातात घेतल्याने बीड तालुक्यात या घटनेची जोरदार चर्चा होत आहे.

Web Title : बीड: गाँव के मुखिया ने काम में दखल देने पर उप-मुखिया पर हमला किया; तनाव बढ़ा

Web Summary : बीड में, एक गाँव के मुखिया ने गाँव के काम में कथित हस्तक्षेप को लेकर एक उप-मुखिया पर हमला किया। पंचायत समिति कार्यालय में हुई इस घटना में मारपीट हो गई। पुलिस में शिकायत दर्ज; बढ़ते तनाव के बीच जांच जारी।

Web Title : Beed: Village Head Attacks Deputy Over Work Interference; Tensions Rise

Web Summary : In Beed, a village head attacked a deputy head over alleged interference in village work. The incident occurred at the Panchayat Samiti office, escalating into a physical altercation. Police complaint filed; investigation underway amid rising tensions.