शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

गडकरींच्या गादीसाठी लढाई

By admin | Updated: June 19, 2014 00:56 IST

विधान परिषदेच्या नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघासाठी २० जून रोजी मतदान होत आहे. आजवर ही जागा भाजपचे राष्ट्रीय नेते व केंद्रीय परिवहन आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या ताब्यात होती.

पदवीधर निवडणूक : सोले, तायवाडे, गजभिये रिंगणातनागपूर : विधान परिषदेच्या नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघासाठी २० जून रोजी मतदान होत आहे. आजवर ही जागा भाजपचे राष्ट्रीय नेते व केंद्रीय परिवहन आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या ताब्यात होती. यावेळी भाजपचे महापौर अनिल सोले, काँग्रेसचे डॉ. बबनराव तायवाडे व फुले, शाहू आंबेडकर पदवीधर संघटनेचे किशोर गजभिये यांच्यात तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. काट्याची लढत पाहता रिंगणातील इतर उमेदवारांना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. १९८९, १९९६, २००२ व २००८ अशा चारही निवडणुकांमध्ये नितीन गडकरी यांनी या मतदारसंघात बाजी मारली. यावेळी गडकरी यांनी नागपुरातून लोकसभेची निवडणूक लढवित एकतर्फी विजय नोंदविला. त्यामुळे आता या मतदारसंघाचे नेतृत्व गडकरी कुणाकडे सोपवितात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अशात नागपूरचे महापौर अनिल सोले यांना उमेदवारी देण्यात आली. सोले यांच्यासाठी गडकरी यांनी मेळावे घेतले. भाजपचे सहाही जिल्ह्यातील कॅडर ताकदीने कामाला लागले. प्रश्न गडकरींची गादी कायम राखण्याचा असल्यामुळे सोले यांना खूप परिश्रम घ्यावे लागतील. गेल्या निवडणुकीत भाजपचे नितीन गडकरी यांनी विविध शिक्षक व कर्मचारी संघटनांचे उमेदवार डॉ. बबनराव तायवाडे यांना पराभूत केले होते. गडकरी यांनी ५२ हजार ७६१ मते म्हणजे एकूण मतदानाच्या ५४.६३ टक्के मते घेत ही निवडणूक एकतर्फी केली होती. तायवाडे यांना २८,८३६ (२९.८६ टक्के) मते मिळाली होती. यावेळी तायवाडे हे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व रिपाइंचे अधिकृत उमेदवार आहेत. तायवाडे यांच्यासाठी यावेळी प्रदेश व शहर काँग्रेसने बराच जोर लावला. माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये हे फुले शाहू आंबेडकर पदवीधर संघटनेकडून रिंगणात उतरले आहेत. आंबेडकरी संघटनांमध्ये त्यांचे तगडे नेटवर्क आहे. मतदार नोंदणीपासून ते सक्रिय होते. बसपाने त्यांना समर्थन दिल्याने सामना तिरंगी झाला आहे. याशिवाय भाजपचे बंडखोर महेंद्र निबार्ते, पांडुरंग डबले, अब्दुल सिद्धीकी, अर्चना महाबुधे, अमोल हाडके, राजेंद्र कराळे, गोकुल पांडे, चंद्रकांत गेडाम, महादेव पाटील, राजेंद्र लांजेकर, तीर्थराज हरिणखेडे या उमेदवारांनी ही निवडणूक अधिकच टफ केली आहे. (प्रतिनिधी)