शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

‘एव्हीएच’ अखेर चंदगडमधून हद्दपार

By admin | Updated: February 14, 2016 00:20 IST

गेली तीन वर्षे चंदगड परिसरातील जनतेच्या जीवनमरणाचा प्रश्न बनलेला ‘एव्हीएच’ प्रकल्प चंदगडमधून हद्दपार होणार आहे. कंपनीने इप्सिलॉन कार्बन प्रा. लि. असे नाव बदलून प्रकल्प

बेल्लारी येथे प्रकल्प हलविणार : सेंट्रल एक्साईजकडे मागितली परवानगी

कोल्हापूर : गेली तीन वर्षे चंदगड परिसरातील जनतेच्या जीवनमरणाचा प्रश्न बनलेला ‘एव्हीएच’ प्रकल्प चंदगडमधून हद्दपार होणार आहे. कंपनीने इप्सिलॉन कार्बन प्रा. लि. असे नाव बदलून प्रकल्प मुशिनयक्कनहळ्ळी, सुलतानपूर रोड, सोंडूर, जिल्हा-बेल्लारी (कर्नाटक) येथे हलविण्यासाठी उपायुक्त, सेंट्रल एक्साईज यांच्याकडे परवानगी मागितल्याची माहिती राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ व आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी आमदार मुश्रीफ म्हणाले, चंदगड तालुक्यात तीन वर्षांपूर्वी विनाशकाली एव्हीएच प्रकल्प सुरू झाला. यामुळे साऱ्या तालुक्याचे आरोग्य धोक्यात आल्याने याविरोधात मोठे जनआंदोलन उभे राहिले. जनआंदोलन कृती समितीच्या वतीने रस्त्यापासून न्यायालयापर्यंत अनेक लढाया केल्या. त्यामुळेच गेले ११ महिने प्रकल्प बंद आहे. दोन महिन्यांपासून प्रकल्पाने हळूहळू गाशा गुंडाळण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीला त्यांनी ‘एव्हीएच’चे नामकरण करीत इप्सिलॉन कार्बन प्रा. लि.च्या माध्यमातून प्रकल्प बेल्लारी येथे हलविण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी कंपनीने ११ जानेवारीला सेंट्रल एक्साईजकडे केली आहे. (प्रतिनिधी)फटाक्यांच्या आतशबाजीत विजयोत्सवशासकीय विश्रामगृहावर एव्हीएच हद्दपार झाल्याची माहिती आ.मुश्रीफ देत असतानाच चंदगडच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतशबाजी करीत विजयोत्सव साजरा केला. ‘घालविला रे घालविला, एव्हीएच घालविला’ अशा घोेषणा दिल्या.‘नंदी’ची चौकशी लावणार‘एव्हीएच’ने १८० कोटींचा अति प्रदूषणकारी अंतर्गत येणारा उद्योग परवाना घेतला नसताना प्रकल्प चालूच झाला कसा? याबाबत मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.चंदगडमधील लहान मुलांसह वयोवृद्धांनी आंदोलनात सहभाग घेतला. आपल्या आमदारकीच्या काळात हा प्रकल्प उभा राहिल्याने तो घालविणे हे माझे कर्तव्य होते. नंदाताई बाभूळकरांनी सातत्याने पाठपुरावा करीत न्यायालयीन लढाई दिली. आजच्या विजयावर राष्ट्रवादी कॉँग्रेस कधीच दावा करणार नाही. सर्वपक्षीय लोकांनी विशेषत: चंदगड, गडहिंग्लजची जनता पाठीशी राहिल्यानेच यश आले. - संध्यादेवी कुपेकर,आमदार, चंदगड विधानसभा