अपंग अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2016 02:57 IST2016-09-26T02:57:44+5:302016-09-26T02:57:44+5:30

मोहरी येथील अल्पवयीन अपंग मुलीवर गावातीलच ५५ वर्षांच्या इसमाने अत्याचार केल्याची घटना रविवारी दुपारी घडली़ घटनेनंतर तक्रार करण्यास निघालेल्या पीडित

Atrocities on disabled minor girls | अपंग अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अपंग अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पाथर्डी (जि. अहमदनगर) : मोहरी येथील अल्पवयीन अपंग मुलीवर गावातीलच ५५ वर्षांच्या इसमाने अत्याचार केल्याची घटना रविवारी दुपारी घडली़ घटनेनंतर तक्रार करण्यास निघालेल्या पीडित मुलीच्या नातेवाइकांना आरोपीचा मुलगा व नातेवाइकांनी फिर्याद दिली तर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पीडितेच्या कुटुंबीयांना आधार देत मुलीच्या चुलत भावाने आरोपीविरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपीस तत्काळ अटक केली आहे. मोहरी येथील हे गरीब कुटुंब आहे. सदर मुलीस बोलताही येत नाही आणि चालताही येत नाही़ रविवारी तिचे आई-वडील व लहान भाऊ घरात नसताना गावातीलच अशोक सदाशिव वाल्हेकर याने घरात घुसून तिच्यावर अत्याचार केला़ त्याच वेळी तिचा लहान भाऊ घरी आला असता ही बाब निदर्शनास आली़
पीडित मुलीचे कुटुंबीय तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आले. त्या वेळी आरोपीच्या मुलाने व नातेवाइकांनी आम्ही मागासवर्गीय आहोत. आमच्याविरोधात फिर्याद दाखल केली तर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. 

Web Title: Atrocities on disabled minor girls