शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ साखर कारखान्यांची मालमत्ता जप्त

By admin | Updated: June 23, 2015 02:22 IST

राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपीची थकीत रक्कम येत्या दोन आठवड्यांत न देणाऱ्या साखर कारखान्यांची मालमत्ता जप्त करून त्यांच्यावर

पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपीची थकीत रक्कम येत्या दोन आठवड्यांत न देणाऱ्या साखर कारखान्यांची मालमत्ता जप्त करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन शासनाने दिल्यामुळे स्वाभिमानी संघटनेने आपले बेमुदत ठिय्या आंदोलन आंदोलन सोमवारी मागे घेतले़ सायंकाळी उशिरापर्यंत राजू शेट्टी यांची साखर आयुक्त डॉ. बिपीन शर्मा यांच्या माध्यमातून शासनाशी चर्चा सुरू होती. ज्या साखर कारखान्यांकडे २०१४-१५च्या हंगामातील शेतकऱ्यांना ऊस बिलापोटी एफआरपीची थकबाकी आहे व ज्याची सुनावणी झाली आहे, त्यांनी दोन आठवड्यांच्या आता पैसे अदा करा, असे आदेश शासनाच्या वतीने साखर आयुक्तांनी दिले आहेत. तर, अन्य कारखान्यांनी तीन आठवड्यांत सर्व कारवाई पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी शासनाला मुदत देऊन बेमुदत ठिय्या आंदोलन मागे घेतल्याचे शेट्टी यांनी सांगितले.तत्पूर्वी, देशात व राज्यात सत्ताबदल करून भाजपाला सत्तेवर आणल्याची मोठी शिक्षा सध्या शेतकरी भोगत असल्याच्या तीव्र भावना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलनाच्या वेळी व्यक्त केली. शेतकऱ्यांचे एफआरपी नुसार मिळणारे हक्काचे तब्बल ३ हजार ८०० कोटी रुपये राज्यातील साखर कारखान्यांनी थकविले आहेत. हे पैसे नाकारणाऱ्या साखर कारखान्यांची संचलाक मंडळे बरखास्त करुन त्यांना तुरुंगात डांबावे, अशी मागणी ‘स्वाभिमानी’ने केली. (प्रतिनिधी)