बालिकांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास अटक

By Admin | Updated: November 1, 2015 01:58 IST2015-11-01T01:58:08+5:302015-11-01T01:58:08+5:30

खाऊचे आमिष दाखवून आठ वर्षांच्या दोन बालिकावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या एका नराधमाला अंबोली पोलिसांनी गजाआड केले. शहजाद अमिरुद्दिन अन्सारी (वय ४०) असे त्याचे नाव असून

Arrested for sexually abusing children | बालिकांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास अटक

बालिकांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास अटक

- अंबोलीतील घटना

मुंबई: खाऊचे आमिष दाखवून आठ वर्षांच्या दोन बालिकावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या एका नराधमाला अंबोली पोलिसांनी गजाआड केले. शहजाद अमिरुद्दिन अन्सारी (वय ४०) असे त्याचे नाव असून, त्याच्यावर यापूर्वी अशा प्रकारचे सहा गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. अंबोली परिसरातील एका शाळेत तिसरीच्या वर्गात शिकत असलेल्या चिनू व मीनू (बदललेली नावे) एकाच इमारतीत राहतात.
गुरुवारी रात्री त्या राहत्या इमारतीबाहेरील परिसरात खेळत होत्या. त्यावेळी शहजादची त्यांच्यावर नजर पडली. त्यांना चॉकलेट व आइस्क्रीम देण्याचे आमिष दाखवून आपल्यासोबत येण्यास सांगितले. त्यांनी नकार देताच, त्याने दोघींना मारण्याची धमकी देत, बळजबरीने इमारतीच्या पाचव्या आणि सहाव्या मजल्यावरील रिकाम्या पॅसेजमध्ये नेले. तेथे त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले.
चिनूने त्याच्या तावडीतून पळ काढीत घरी जाऊन आईला हा प्रकार सांगितला. तिचे पालक व शेजाऱ्यांनी तातडीने जिन्याकडे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत मिनूवर लैंगिक अत्याचार करून त्याने पलायन केले होते. याबाबत दोघींच्या पालकांनी पोलिसांकडे जाऊन तक्रार दिली. त्यांनी सांगितलेल्या वर्णनानुसार, शुक्रवारी शहजाद अन्सारीला पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर बालक अत्याचार प्रतिबंधक (पास्को) कलम लावण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Arrested for sexually abusing children