शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

‘मेट्रो रिजन’ला मंजुरी

By admin | Updated: February 1, 2015 01:03 IST

नागपूरच्या सीमेलगत २५ किलोमीटर परिसराचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नागपूर महानगर क्षेत्र विकास योजनेचा प्रारूप आराखडा शनिवारी मुख्यमंत्र्यांनी मंजूर केला.

मुख्यमंत्र्यांचा पुढाकार : नागपूर परिसराच्या विकासाचा मार्ग मोकळानागपूर : नागपूरच्या सीमेलगत २५ किलोमीटर परिसराचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नागपूर महानगर क्षेत्र विकास योजनेचा प्रारूप आराखडा शनिवारी मुख्यमंत्र्यांनी मंजूर केला. यावर दोन महिन्यात जनतेकडून आक्षेप आणि सूचना मागविण्यात येणार असून त्यानंतर त्याला अंतिम मंजुरी दिली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. यामुळे नागपूर परिसरातील विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. आघाडी सरकारच्या कार्यकाळात तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी महानगर नियोजन समितीची बैठक न घेतल्याने हा विकास आराखडा प्रलंबित होता. विद्यमान मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीपासूनच यात लक्ष घातले. समितीवर नवीन सदस्य नामनिर्देशित केले. शनिवारी महानगर नियोजन समितीची विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. मंजूर विकास आराखड्यात नागपूर महापालिकेच्या हद्दीबाहेरील ७२१ गावांचा समावेश करण्यात आला असून तेथील ३५६७ चौरस किलोमीटर क्षेत्राच्या विकासासाठी ४१ हजार २१५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. येथे आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. त्यात मेट्रो रेल्वे, बस, दवाखाने, उद्यान, व्यापारी संकुले, लॉजिस्टिक हब, शाळा, रस्ते आदी सुविधांचा समावेश असेल. ग्रोथ सेंटर विकसित करण्यासाठी १ हजार हेक्टर जागा राखून ठेवण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी बैठकीत केली. घनकचरा व्यवस्थापनासाठी ५० टक्के निधी भूसंपादनाच्या अधिग्रहणाकरिता उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रारंभी नासुप्रचे सभापती श्याम वर्धने यांनी आराखड्याचे सादरीकरण केले. बैठकीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. अजय संचेती, आमदार सुधाकर देशमुख, आशिष देशमुख, नगरविकास खात्याचे प्रधान सचिव नितीन करीर, मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण दराडे, विभागीय आयुक्त अनुपकुमार, महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर, महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष नरेंद्र बोरकर, नासुप्रचे विश्वस्त डॉ. रवींद्र भोयर उपस्थित होते. काय असेल मेट्रो रिजनमध्ये ? ट्रान्सपोर्ट सुविधालॉजिस्टिक हबकन्व्हेन्शन सेंटरमेट्रो रेल्वे, बस सुविधाबस टर्मिनल्सरस्त्याचे नेटवर्कउद्याने व इतरही सुविधा