शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

अपर आयुक्तांना ‘अ‍ॅट्रॉसिटी’ लावा

By admin | Updated: November 18, 2014 02:46 IST

आदिवासींच्या जमिनीसंदर्भातील वाद न्यायप्रविष्ट असतानाही त्याचे सील तोडण्याचा आदेश देण्यात आले आहेत

ठाणे : आदिवासींच्या जमिनीसंदर्भातील वाद न्यायप्रविष्ट असतानाही त्याचे सील तोडण्याचा आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणी कोकण विभागीय अपर आयुक्तांविरोधात अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तेथील आदिवासींची मागणी आहे. त्यांनी तहसीलदारांना यासंदर्भात निवेदनाद्वारे इशाराही दिला आहे. कल्याण तालुक्यातील कांबा गावाच्या परिसरातील आदिवासींच्या जमिनी हडप करून त्यावर बेकायदा लघुउद्योग सुरू करण्यात आले होते. गोदामही बांधले होते. हे उद्योग आणि गोदाम सील करण्याचे आदेश तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार, ते सील करण्यात आले आहेत. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही कोकण विभागीय अपर आयुक्तांनी ते सील तोडण्याचे आदेश नुकतेच दिले. त्यामुळे त्यांच्याविरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न या आदिवासींकडून केला जात आहे. या मनमानी निर्णयासह अधिकारी, कर्मचारी सतत निरनिराळे डावपेच आखून बुधराणी कुटुंबाला पाठीशी घालत आहेत. त्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना मदत करीत असल्याचा आरोप करून अपर आयुक्तांचा आदेश चुकीचा असल्याची हरकत घेऊन त्याविरोधात आंदोलन करून अ‍ॅट्रॉसिटीखाली गुन्हा दाखल करण्याचा इशाराही दिला आहे. त्यामुळे विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालयातील संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांसह आताच्या आदेशामुळे अपर आयुक्त, तहसीलदार अन्य संबंधित अधिकारी-कर्मचारी अडचणीत येण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)