पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

By Admin | Updated: October 20, 2015 00:12 IST2015-10-20T00:12:27+5:302015-10-20T00:12:27+5:30

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व नवमहाराष्ट्र युवा अभियान यांच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय सामाजिक व क्रीडा युवा पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठविण्याचे

Appeal to send a proposal for the award | पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

पुणे : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व नवमहाराष्ट्र युवा अभियान यांच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय सामाजिक व क्रीडा युवा पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सामाजिक व क्रीडा
क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवक व युवतींना
प्रत्येकी एक असे चार पुरस्कार
दिले जातात. पुरस्कारासंबंधीची संपूर्ण माहिती व अर्ज www.ybchavanpratishthan.org  या संकेतस्थळावर देण्यात आले आहेत. आपले प्रस्ताव व अर्ज संपूर्ण माहितीनिशी १० डिसेंबरच्या आत संघटक, नवमहाराष्ट्र युवा अभियान, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जनरल जगन्नाथराव भोसले
मार्ग, मंत्रालयासमोर, मुंबई
२१ या पत्त्यावर पाठवावेत,
असे आवाहन संयोजकांनी केले
आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Appeal to send a proposal for the award