एसीबीपुढे निवेदन मांडा - हायकोर्ट

By Admin | Updated: October 15, 2016 03:58 IST2016-10-15T03:58:06+5:302016-10-15T03:58:06+5:30

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांची

Appeal before ACB - HC | एसीबीपुढे निवेदन मांडा - हायकोर्ट

एसीबीपुढे निवेदन मांडा - हायकोर्ट

मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी करावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना एसीबीपुढे निवेदन मांडण्याचे आदेश देत एसीबीला दोन आठवड्यांत यावर निर्णय घेण्यास सांगितले आहे. या सर्वांची एसीबीने चौकशी करावी, अशी मागणी करणारी याचिका क्रांतीकारी जयहिंद सेनेने उच्च न्यायालयात दाखल केली. खंडपीठाने एसीबीला दोन आठवड्यांत यावर निर्णय घेण्यास सांगितले.(प्रतिनिधी)

Web Title: Appeal before ACB - HC