शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार यांच्याविरुद्धची अण्णांची याचिका फेटाळली

By admin | Updated: January 7, 2017 06:29 IST

२५ हजार कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याच्या सीबीआय चौकशीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी तूर्त फेटाळली

मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीतील २५ हजार कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याच्या सीबीआय चौकशीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी तूर्त फेटाळून लावत आधी एफआयआर नोंदवण्याची सूचना केली.या याचिकेत अण्णा हजारे यांनी या घोटाळ्यास राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांचे पुतणे अजित पवार यांना जबाबदार धरत त्यांना प्रतिवादीही केले आहे.सहकारी साखर कारखाने खरेदी-विक्रीत झालेल्या कथित घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अण्णा हजारेंनी जनहित याचिकेत केली आहे. ‘सहकारी साखर कारखाने डबघाईला आणून ते कवडीमोल भावाने विकणे, असा प्रकार राज्यात सुरू आहे. या सर्व प्रकारात राज्य सरकारला २५ हजार कोटी रुपयांचा फटका बसला आहे,’ असे याचिकेत म्हटले आहे. ‘सकृतदर्शनी या घोटाळ्यास जबाबदार असलेल्यांची सर्व संपत्ती ताब्यात घेण्यात यावी. त्यासाठी कोर्ट रिसीव्हरची नियुक्ती करावी. तसेच सहकारी साखर कारखान्यांच्या खरेदी-विक्री व्यवहाराची चौकशी करण्यासाठी आयोगाचीही नियुक्ती करावी,’ अशा मागण्याही हजारे यांनी याचिकेद्वारे केल्या आहेत. या जनहित याचिकेव्यतिरिक्त आणखी दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यातील एक याचिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी यांनी सादर केली आहे. (प्रतिनिधी) >उच्च न्यायालय काय म्हणाले...आधी पोलिसांकडे गुन्हा नोंदवा. त्यांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिला तर उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडे जा. त्यांनीही काहीही केले नाही तर आमच्याकडे या, असे न्या. अभय ओक व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.आम्ही या टप्प्यावर सीबीआय चौकशी करण्याचे आदेश देऊ शकत नाही. पोलिसांकडे गुन्हा न नोंदवताच तुम्ही सीबीआय चौकशीची मागणी कशी करू शकता, असा सवालही न्यायालयाने केला. त्यावर अण्णा हजारेंच्या वकिलांनी एफआयआर नोंदवण्यासाठी खंडपीठाकडे एका महिन्याची मुदत मागितली. खंडपीठाने ती मान्य करत या याचिकेवरील पुढील सुनावणी १३ फेब्रुवारी रोजी ठेवली आहे.