शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 07:12 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अण्णा...आपण ज्येष्ठ आहात. आम्ही आपल्याला काय सांभाळणार? आपणच आम्हाला सांभाळून घ्या, आम्ही चांगले काम करत राहू.  घरची व्यक्ती घरी आल्याचा आम्हाला आनंद आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: आपले मेहुणे गोपीनाथ मुंडे यांना पुढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करायचे, असे एका घटनाक्रमाने प्रमोद महाजन यांच्या मनात आले आणि तेव्हापासून माझा छळवाद सुरू झाला, त्यामुळे मी भाजप सोडून गेलो, अशी वेदना ज्येष्ठ नेते अण्णा डांगे यांनी बुधवारी शरद पवार गटाला रामराम करत भाजपमध्ये पुन्हा प्रवेश करताना बोलून दाखविली. ‘अण्णा! आपण भाजप सोडून गेलात याची खंत मुंडे साहेबांनाही होती’ असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मग सावरून घेतले.

आपले दोन मुलगे चिमण आणि विश्वनाथ तसेच समर्थकांसह अण्णांनी २३ वर्षांनंतर भाजपमध्ये घरवापसी केली. प्रदेश भाजप कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात अण्णा डांगे म्हणाले की, जे हयात नाहीत त्यांच्याबद्दल  बरे-वाईट बोलणे योग्य नाही पण पक्षात त्यावेळी एक चुरस निर्माण झाली. अटलजींना कोणी विचारले की आपले उत्तराधिकारी कोण त्यावर त्यांनी प्रमोद महाजन यांच्यासह तीन-चार नावे घेतली. आपण पंतप्रधान होणार, असे महाजन यांच्या डोक्यात शिरले मग आपले मेहुणे गोपीनाथ मुंडे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, असेही त्यांच्या मनात आले अन् तिथून माझा छळवाद सुरू झाला. 

बाळासाहेबही माझ्या कामावर खूश होते

माझ्याकडे असणाऱ्या पाणीपुरवठा खात्यामार्फत सुमारे साडेपंधरा हजार कोटी रुपयांची टँकरमुक्तीची योजना चांगल्या रितीने राबविली जात होती. या कामाची दखल सर्वदूर घेतली गेला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या माझ्या कामावर खूपच खूश होते. उद्या भाजपकडून मुख्यमंत्री पदासाठी माझे नाव आले तर बाळासाहेब ते उचलून धरतील, असे चित्र होते, तेही अडचणीचे ठरले, असे अण्णा डांगे म्हणाले. 

‘तो’ आमच्या मनात नाही

सांगली जिल्ह्यातील आणखी कोणी मोठे नेते भाजपमध्ये येणार का, या प्रश्नात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की जो प्रवेश तुमच्या मनात आहे तो आमच्या मनात नाही.

घरची व्यक्ती घरी आल्याचा आनंद फडणवीस

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अण्णा...आपण ज्येष्ठ आहात. आम्ही आपल्याला काय सांभाळणार? आपणच आम्हाला सांभाळून घ्या, आम्ही चांगले काम करत राहू.  परखड स्वभाव असलेले अण्णा एका विशिष्ट परिस्थितीत पक्ष सोडून गेले, पण गोपीनाथरावांना त्याची नेहमीच खंत होती. तेव्हाही पक्षात त्यांच्या ज्येष्ठत्वाचा मान होता. अण्णांनी पक्ष सोडला पण त्यांच्यावर झालेला संस्कार आणि त्यातून तयार झालेला विचार त्यांनी कधीही सोडला नाही.  भाजप हेच आपले घर आहे हीच त्यांची भावना नेहमी राहिली, घरची व्यक्ती घरी आल्याचा आम्हालाही आनंद आहे.  यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, चिमण डांगे आदींची भाषणे झाली.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाPoliticsराजकारण