शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

"दिवट्या आमदार..."; सुनील टिंगरेंवर शरद पवारांची टीका; अजितदादा म्हणाले, "बदनामीचा प्रयत्न..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 09:55 IST

शरद पवार यांनी आमदार सुनील टिंगरे यांच्यावर केलेल्या टीकेवरुन अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

Ajit Pawar On Sunil Tingre : पुण्याच्या पोर्शे अपघात प्रकरणात अजित पवार गटाचे वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे हे मोठ्या प्रमाणात चर्चेत आले होते. या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्यानंतर आमदार सुनील टिंगरे यांना विरोधकांनी लक्ष्य केलं होतं. त्यानंतर काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनीही पुणे अपघात प्रकरणावरून सुनील टिंगरे यांच्यावर टीका केली होती.  अपघातानंतर सुनील टिंगरेंनी विशाल अग्रवाल यांच्या मुलाला वाचवण्यासाठी प्रयत्न केल्याचे शरद पवारांनी म्हटलं. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुनील टिंगरेंची पाठराखण केली आहे.

पुण्यातील खराडी येथे एका कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी आमदार सुनील टिंगरेंवर घणाघात केला होता. पुण्यातील कल्याणीनगरमध्ये पोर्शे कारने एका दुचाकीला धडक दिल्यामुळे दोघे ठार झाले होते. या घटनेनंतर आमदार सुनील टिंगरे पोलीस ठाण्यात गेले होते. यावरुनच आमदार सुनील टिंगरेंनी आरोपीला वाचवण्यासाठी प्रयत्न केल्याचा दावा शरद पवारांनी केला होता. तसेच तू सोडून गेला ते ठिक आहे. निवडणुकीत तुझा कसा बंदोबस्त करायचा ते करू', असा इशारा शरद पवारांनी दिला होता. यावरुन आता अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

"सुनील टिंगरे तू कुणाच्या पक्षातून निवडून आला? हा पक्ष कोणी काढला, सगळ्या हिंदुस्थानला माहिती आहे. त्या पक्षाच्या वतीने तुला संधी दिली. तू सोडून गेला, ते ठीक आहे. निवडणुकीत तुझा कसा बंदोबस्त करायचा ते करू. दोन तरुण मुलांना त्यांनी उडवलं काय, जागच्या जागी त्यांची हत्या काय होते. अशा वेळी जे जखमी झाले, त्यांना मदत करण्याऐवजी हा दिवट्या आमदार पोलीस ठाण्यात जातो आणि चालकाला वाचवतो. यासाठी मते मागितली होती का?," असा सवाल शरद पवार यांनी केला.

शुक्रवारी वडगाव शेरीचे आमदार सुनिल टिंगरे यांच्या मतदारसंघात अजित पवारांनी वेगवेगळ्या विकासकामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन केलं. यावेळी बोलताना अजित पवारांनी सुनिल टिंगरेंची पाठराखण केली. मध्यंतरी आमच्या सुनिल टिंगरेला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न काही जणांनी केला, असं अजित पवार यांनी म्हटलं.

"अलीकडच्या काळात इकडचे तिकडे जाऊ लागले आहेत, लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार आहे, मी त्यावर टिप्पणी करणार नाही. एक लोकप्रतिनिधी ज्याने नगरसेवक म्हणून सुद्धा काम केलं, सगळ्यांच्या मध्ये मिळून मिसळून राहणाऱ्या सुनिल टिंगरेला बदनाम करण्याचा प्रयत्न काहींनी केला," असे अजित पवार म्हणाले.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारsunil tingreसुनील टिंगरे