शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
3
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
4
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
5
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
6
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
7
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
8
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
9
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
10
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
11
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
12
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
13
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
14
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
15
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
16
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
17
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
18
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
19
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
20
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी

कमला मिलच्या दुर्घटनेनंतर आदित्य ठाकरेंच्या रुफटॉप हॉटेलच्या प्रस्तावावर टांगती तलवार ?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2017 2:27 PM

मुंबई- कमला मिल अपघातानंतर युवा सेनाध्यक्ष आदित्य ठाकरे यांचं रुफटॉप हॉटेलच्या प्रस्ताव पुन्हा एकदा बारगळण्याची शक्यता आहे. गच्चीवर हॉटेल उभारणीच्या प्रस्तावाला महापालिकेच्या महासभेत मंजुरी देण्यात आली होती.

मुंबई- कमला मिल दुर्घटनेनंतर युवा सेनाध्यक्ष आदित्य ठाकरे यांचा रुफटॉप हॉटेलचा प्रस्ताव पुन्हा एकदा बारगळण्याची शक्यता आहे. गच्चीवर हॉटेल उभारणीच्या प्रस्तावाला महापालिकेच्या महासभेत मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर पालिका आयुक्त अजोय मेहतांनीही याला परवानगी दिली होती. परंतु कमला मिल दुर्घटनेनंतर महापालिका आयुक्त तो निर्णय रद्द करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रुफटॉप हॉटेल्स हा शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. यासंदर्भातील प्रस्ताव महापालिकेच्या सभागृहात बारगळला होता. परंतु त्याचा मार्ग आयुक्तांच्या परवानगीनंतर मोकळा झाला होता.महापालिकेत सत्तेत भागीदार असतानाही गच्चीवरील रेस्टॉरंटला भाजपाचा कायम विरोध होता. त्यामुळे गेली दोन वर्षे लटकलेला हा प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी शिवसेनेचे युवराज स्वत: मैदानात उतरले होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं. पहारेक-यांचा विरोध मावळणे शक्य नसल्याने आपल्या युवराजांचे हे स्वप्न साकार करण्यासाठी शिवसेनेचे शिलेदारही कामाला लागले होते. मुंबईत गच्चीवरील रेस्टॉरंटची मागणी आदित्य ठाकरे यांनी लावून धरली होती. 2015मध्ये तत्कालीन मित्रपक्ष भाजपानेच काँग्रेसला हाताशी धरून हा प्रस्ताव सुधार समितीच्या बैठकीत फेटाळला होता. परंतु या स्वप्नावर पाणी फेरू देण्यास युवराज तयार नव्हते. त्यामुळे दोन वर्षांनंतर हा प्रस्ताव पुन्हा चर्चेत आला. या प्रस्तावावर शिवसेना सर्व पक्षाचे मत आजमावत आहे. मात्र स्वतंत्र निवडणूक लढविल्यानंतर भाजपा या प्रस्तावाला पाठिंबा देणार नाही. त्यामुळे पालिका महासभेत हा प्रस्ताव आल्यास त्यावर मतदान होऊन शिवसेनेची फजिती होण्याची शक्यता आहे. परंतु भाजपा आता पहिल्या क्रमांकाचा शत्रू असल्याने हा पराभव शिवसेनेला मान्य होणार नाही. दोन वर्षांनंतर शिवसेनेला या प्रस्तावाला मंजुरी मिळवून देण्यात यश आलं आहे. या प्रकल्पामुळे नोकरीची संधी बेरोजगारांना उपलब्ध होईल; तसेच पालिकेचाही महसूल वाढेल, असा दावा त्यांनी केला.

असा लटकला होता प्रस्तावमुंबईत गच्चीवरील रेस्टॉरंट बेकायदा पद्धतीने सुरू असल्याने ते अधिकृत करून पालिकेचा महसूल वाढविण्याचा निर्णय प्रशासनाने 2012मध्ये घेतला. समाजवादी पक्षाचे फराहन आझमी यांच्या मागणीनुसार हा प्रस्ताव तयार झाल्यानंतर मंजुरीसाठी सुधार समितीपुढे पाठविण्यात आला. आदित्य ठाकरे यांच्या नाइट लाइफच्या प्रस्तावाला धरून असलेल्या या प्रस्तावाला शिवसेनेचे समर्थन होते. मात्र भाजपाने काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे या विरोधी पक्षांच्या मदतीने सुधार समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव फेटाळला होता.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेKamala Mills fireकमला मिल अग्नितांडव