सामूहिक बलात्कारानंतर युवतीची अमानुष हत्या

By Admin | Updated: June 2, 2014 23:30 IST2014-06-02T23:30:58+5:302014-06-02T23:30:58+5:30

सामूहिक बलात्कार करून अमानुषपणो हत्या करण्यात आली. हत्या करण्याआधी पीडित तरुणीला अॅसिड पाजल्याचे उघड झाले आहे.

After the gang rape, inhuman killing of a woman | सामूहिक बलात्कारानंतर युवतीची अमानुष हत्या

सामूहिक बलात्कारानंतर युवतीची अमानुष हत्या

>बरेली : बदायूँ सामूहिक बलात्काराविरोधात देशभर संताप व्यक्त होत असतानाच बरेली जिल्ह्यात एका 22 वर्षीय तरुणीची सामूहिक बलात्कार करून अमानुषपणो हत्या करण्यात आली. हत्या करण्याआधी पीडित तरुणीला अॅसिड पाजल्याचे उघड झाले आहे. 
बरेली जिल्ह्यातील ऐतपुरा गावात एका शेतात पीडित तरुणीचा मृतदेह आढळून आला. तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचे शवविच्छेदनात स्पष्ट झाले आहे. तरुणीच्या पोटात अॅसिड आढळले आहे. तिच्यावर बलात्कार करणा:या नराधमांनी तिला ठार मारण्यासाठी बळजबरीने तिला अॅसिड पाजल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच तिची ओळख पटू नये म्हणून तिच्या चेह:यावर अॅसिड टाकल्याच्याही खुणा आढळल्या आहेत. पीडित युवती उत्तराखंडची रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर एक तपास पथक उत्तराखंडला रवाना झाले असल्याचे पोलीस अधिकारी जे. रवींद्र गौर यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
 
-पीडित तरुणीची हत्या ‘ऑनर किलिंग’चा प्रकार असण्याची किंवा तरुणीची शरीरविक्रय व्यवसायासाठी विक्री करण्याच्या प्रकारातून झाल्याची शक्यता पोलीस उपअधीक्षक बहेरी कालूसिंग यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: After the gang rape, inhuman killing of a woman