अदनान सामीला हायकोर्टाचा दिलासा

By Admin | Updated: June 15, 2014 02:20 IST2014-06-15T02:20:41+5:302014-06-15T02:20:41+5:30

पाकिस्तानी गायक अदनान सामीने पत्नी सबा गदारीला अंधेरी येथील ४ फ्लॅट व ६ कोटी रुपये द्यावेत, हे कौटुंबिक न्यायालयाचे आदेश

Adnan Sami gets relief from the High Court | अदनान सामीला हायकोर्टाचा दिलासा

अदनान सामीला हायकोर्टाचा दिलासा

मुंबई : पाकिस्तानी गायक अदनान सामीने पत्नी सबा गदारीला अंधेरी येथील ४ फ्लॅट व ६ कोटी रुपये द्यावेत, हे कौटुंबिक न्यायालयाचे आदेश उच्च न्यायालयाने १० आठवड्यांसाठी स्थगित केले़ तसेच या आदेशाविरोधातील अदनानची याचिका न्यायालयाने अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेतली आहे़
सबा हिने अदनानविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार कौटुंबिक न्यायालयात केली आहे़ त्यावर ५ एप्रिलला न्यायालयाने सबाला नुकसानभरपाई म्हणून १ कोटी, न्यायालयीन खर्चासाठी १ लाख व यासह सबाने २००७-०८मध्ये दिलेले ५ कोटी ३ लाख अदनानने परत करावेत, असे आदेश दिले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Adnan Sami gets relief from the High Court