शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

नाईट लाईफवरुन शिवसेना-राष्ट्रवादी आमनेसामने? आदित्य ठाकरेंचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2020 21:27 IST

कॅबिनेटमध्ये प्रस्तावावर चर्चा झाल्यानंतर निर्णय होईल; गृहमंत्री अनिल देशमुखांचं विधान

मुंबई: राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचा नाईट लाईफबद्दलचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. २२ जानेवारीला होणाऱ्या कॅबिनेटमध्ये याबद्दलच्या प्रस्तावावर चर्चा झाल्यानंतरच निर्णय होईल, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. गृहमंत्र्यांचं हे विधान महत्त्वपूर्ण मानलं जात आहे. आदित्य ठाकरे यांनी नाईट लाईफबद्दल घेतलेल्या निर्णयाची प्रजासत्ताक दिनापासून प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी केली जाणार होती. मात्र अनिल देशमुखांच्या विधानामुळे हा निर्णय लागू होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या पोलिसांवर कामाचा मोठा ताण आहे. पोलीस १२ पेक्षाही जास्त तास काम करत आहेत. त्यामुळे नाईट लाईफ सुरू करण्यासाठी लागणारी यंत्रणा इतक्या कमी वेळेत तयार होणार नाही. नाईट लाईफसाठी आवश्यक असणारे अतिरिक्त पोलीस आहेत का, याची माहिती घ्यावी लागेल. त्यानंतरच याबद्दलचा निर्णय घेतला जाईल, असं देशमुख म्हणाले. देशमुख यांनी केलेल्या विधानामुळे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनी नाईट लाईफच्या निर्णयाची घोषणा करताना घाई केली का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आदित्य यांच्या निर्णयाचं महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी स्वागत केलं होतं. मात्र देशमुख यांच्या विधानामुळे नाईट लाईफची अंमलबजावणी २६ जानेवारीपासून होण्याची शक्यता मावळली आहे. मुंबईत २६ जानेवारीपासून प्रायोगिक तत्त्वावर नाईट लाईफ सुरू करण्याचा निर्णय आदित्य ठाकरेंनी घेतला आहे. त्यानुसार शहराच्या अनिवासी भागातील सर्व चित्रपटगृहं, मॉल्स, रेस्टॉरंट्स २४ तास सुरू राहतील. नरिमन पॉईंट, बीकेसी, कमला मिल, काला घोडा या भागांमध्ये नाईट लाईफ सुरू होणार आहे. 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसAnil Deshmukhअनिल देशमुख