शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

कलावंतांची ‘एक्ङिाट’ घडविणारे अपघात !

By admin | Updated: June 8, 2014 01:54 IST

मराठी नाटय़ व चित्रपटसृष्टीतील काही महत्त्वाचे कलावंत अशाच प्रकारे मृत्यूच्या दाढेत ओढले गेल्याची उदाहरणो ताजी आहेत.

राज चिंचणकर 
नाटकांचे दौरे, चित्रपटांची शूटिंग्ज यासाठी करावा लागणारा वेळीअवेळी प्रवास, दगदग, धावपळ, दिलेल्या वेळा पाळण्यासाठी करावी लागणारी कसरत या सगळय़ाचा एकत्रित परिणाम कलावंतांच्या दिनक्रमावर होत असतो. याचा थेट संबंध कलावंतांच्या आरोग्याशी येतो आणि काही वेळा हा हलगर्जीपणा जिवावरही बेततो. मराठी नाटय़ व चित्रपटसृष्टीतील काही महत्त्वाचे कलावंत अशाच प्रकारे मृत्यूच्या दाढेत ओढले गेल्याची उदाहरणो ताजी आहेत. 
कलावंतांच्या अपघातांचा सिलसिला सामोर आला तो 198क् मध्ये! ज्येष्ठ कलावंत जयराम हर्डीकर व शांता जोग यांना त्या वर्षी अपघातातून काळाने हिरावून नेले आणि कलावंतांच्या अपघाती मृत्यूची चर्चा सुरू झाली. त्यानंतर अवघ्या चार वर्षातच अरुण सरनाईक अपघाताचे कारण होऊन काळाच्या पडद्याआड गेले. लाडका कलावंत अपघाताचे निमित्त होऊन अंतर्धान पावतो. यावर भल्याभल्यांना विश्वास ठेवणो कठीण गेले. 21 जून 1994 रोजी ते ‘पंढरीची वारी’ या चित्रपटाचे चित्रीकरण संपवून टॅक्सीने पुण्याहून कोल्हापूरला चालले होते. पुणो - कोल्हापूर मार्गावरच त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि अरुण सरनाईक नावाचा रसिकप्रिय अभिनेता काळाने हिरावून नेला. 
मराठी चित्रपटसृष्टीतला एक काळ गाजवणारी रंजना देशमुख या अभिनेत्रीला  अपघातात अपंगत्व आले. 1987 मध्ये ‘झुंजार’च्या चित्रीकरणासाठी तेव्हाच्या बंगलोरला जाताना मोटार अपघातात त्या कायमच्या अपंग झाल्या. पायच निकामी झाल्याने तिची चित्रपट कारकीर्दच अकस्मात संपुष्टात आली. 
दूरदर्शनवरून बातम्या सांगणारा गोड चेहरा व मधाळ आवाज यांचा संगम असलेली तसेच नाटय़सृष्टीत अभिनयाचे खणखणीत नाणो वाजवत ‘ती फुलराणी’ म्हणून अजरामर झालेल्या भक्ती बर्वे यांना पुणो-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघात झाला आणि प्रत्येकाच्या मनाचा बांध फुटला. 11 फेब्रुवारी 2क्क्1 रोजी पुणो-मुंबई द्रुतगती मार्गावरील दिव्याच्या खांबावर त्यांची गाडी आदळली आणि भक्ती बर्वे नावाचे पर्व अचानक काळाच्या उदरात गडप झाले. 
अगदी अलीकडेच म्हणावा असा अपघात दोन वर्षापूर्वी मुंबई-पुणो द्रुतगती मार्गावर  झाला होता. 24 डिसेंबर 2क्12 रोजी आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे या जोडगोळीने अचानक घेतलेला निरोप चटका लावणारा ठरला. हे दोघे ‘वॅगन आर’मधून या मार्गावरून प्रवास करीत 
असताना चालकाचा ताबा सुटलेला एक टेम्पो त्यांचा काळ बनून त्यांना सामोर आला आणि एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. उर्स टोल चेकपोस्टजवळ घडलेल्या या अपघाताने मराठी सिनेसृष्टी व मालिकेच्या विश्वातले दोन आघाडीचे मोहरे हरपले. वाढलेली आणि वाढवून घेतलेली कामे, शूटिंग्जची शेडय़ुल्स या सगळय़ांमुळे आजही बरेचसे कलावंत ‘चलता हैं’ या भूमिकेतून वेळीअवेळी प्रवास करीतच आहेत. अर्थात, अपघाताला निमंत्रण नको म्हणून योग्य ती खबरदारी घेतली जाते. असा काही नियम नाही आणि याबाबतीत तशी ती होऊही नये, असेच तमाम मायबाप रसिकांचे या कलावंतांना सांगणो आहे.