शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना मिळणार अपघात विमा

By admin | Updated: September 19, 2015 23:14 IST

राज्यातील शेतकऱ्यांसाठी १ आॅक्टोबरपासून अपघात विमा योजना लागू केली जाणार आहे. विम्याचा हप्ता (प्रीमिअम) शासन भरेल. शेतकऱ्याचा अपघाती किंवा नैसर्गिक आपत्तीने मृत्यू

जळगाव : राज्यातील शेतकऱ्यांसाठी १ आॅक्टोबरपासून अपघात विमा योजना लागू केली जाणार आहे. विम्याचा हप्ता (प्रीमिअम) शासन भरेल. शेतकऱ्याचा अपघाती किंवा नैसर्गिक आपत्तीने मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना २ लाख रुपयांपर्यंत नुकसानभरपाई मिळेल, अशी माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली.राज्यात कर्जाचे पुनर्गठण करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. जिल्हा बँकांकडून कर्ज घेतलेल्यांना या उपक्रमातून पुन्हा कर्ज दिले जाईल. ग्रामपंचायत हद्दीमधील तलाव हे पंचायतींना दिले जातील. ग्रामपंचायतींचे उत्पन्न वाढविण्यासाठी हा निर्णय झाला असून, मासेमारीसाठी तलावांचा उपयोग करता येईल, असेही त्यांनी सांगितले.शेतकऱ्यांना करपामुक्त केळी रोपे मिळावीत, यासाठी इंडो-इस्रायल केळी संशोधन केंद्र महिनाभरात जिल्ह्यात स्थापन केले जाईल. टिश्यू केळीच्या रोपांसाठी कर्जमर्यादेमध्ये वाढ करण्यासंबंधी राज्य शासन विचार करीत आहे. त्यासाठी ५० टक्के अनुदान आणि ५० टक्के कर्ज देता येईल का? याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. जिल्ह्यातील ४,५०० सहकारी संस्था बंद अवस्थेत आहेत. त्यांचे पुनरुज्जीवन होईल का? याबाबत उपनिबंधकांना आदेश दिले आहेत. त्या फक्त कागदावरच राहत असतील तर त्यांची नोंदणी रद्द करावी, अशाही सूचना दिल्या आहेत. सहकारी संस्थांना बळकटी देण्यासाठी ४०० कोटी आणण्याचा प्रयत्न असेल, असेही खडसे म्हणाले. (प्रतिनिधी)