शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
6
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
7
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
8
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
9
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
10
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
11
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
12
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
13
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
14
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
15
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
16
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
17
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
18
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
19
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
20
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शेती विकासाला गती: 'कृषी समृद्धी' योजनेत ५००० कोटींची गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 08:58 IST

या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासावर भर दिला जाईल आणि त्यांना शेतीत आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जाईल.

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मंगळवारी वाढदिवस होता, त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी वाढदिवसाच्या दिवशीच ‘कृषी समृद्धी योजना’ जाहीर केली असून, यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना थेट फायदा होणार असल्याची माहिती  नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत माहिती कोकाटे यांनी दिली. नव्या योजनेत शेतीक्षेत्रात दरवर्षी तब्बल ५ हजार कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक करण्यात येणार आहे. यासंदर्भात आजच अधिकृत शासकीय आदेश (जीआर) जारी करण्यात आला आहे. कृषिमंत्री कोकाटे यांनी स्पष्ट केले की, या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासावर भर दिला जाईल आणि त्यांना शेतीत आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जाईल....अशी असणार गुंतवणूकशेतीतील वैयक्तिक तसेच सामूहिक गुंतवणुकीच्या घटकांवर आधारित कार्यन्वित असलेल्या प्रचलित योजनांसाठी चार हजार कोटी, जिल्हास्तरीय कृषी योजनांसाठी ५००, तर राज्यातील कृषी विकासासाठी आवश्यक संशोधन व इतर महत्त्वपूर्ण प्रकल्प आधारित  योजनांसाठी ५०० कोटी अशी पाच हजार कोटींची गुंतवणूक कृषी समृद्धी योजनेसाठी असतील. 

काय आहे योजना’?कृषी समृद्धी योजना ही राज्यातील शेतीसंबंधी भांडवली गुंतवणुकीला चालना देणारी महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शेतीच्या एकूण उत्पादन प्रक्रियेला सक्षम करणे, त्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा विकसित करणे आणि शेतकऱ्यांना सुलभ व आधुनिक शेती व्यवस्थापनासाठी आर्थिक पाठबळ पुरवणे हा आहे.

टॅग्स :Agriculture Schemeकृषी योजनाAgriculture Sectorशेती क्षेत्रMaharashtraमहाराष्ट्र