शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

सुमारे ८५ हजार विद्यार्थ्यांचे स्वप्न भंगणार

By admin | Updated: September 8, 2014 03:11 IST

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या आयटीआय प्रवेशाला यंदा विद्यार्थ्यांनी उदंड प्रतिसाद दिला आहे

मुंबई : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या आयटीआय प्रवेशाला यंदा विद्यार्थ्यांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. सहाव्या गुणवत्ता यादीनंतर ७२ हजार ३५१ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. रिक्त जागा भरण्यासाठी संचालनालयाने दोन अतिरिक्त फेरी राबविण्याचा निर्णय घेतला असला तरी सुमारे ८५ हजार विद्यार्थ्यांचे आयटीआयचे शिक्षण घेण्याचे स्वप्न भंगणार आहे.राज्यातील ४१७ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ९८ हजार १८५ जागा उपलब्ध आहेत. या जागांसाठी संचालनालयाने आॅनलाइन अर्ज मागविले आहेत. प्रवेशाच्या सहा गुणवत्ता याद्या जाहीर झाल्या आहेत. या याद्यांमध्ये प्रवेश मिळालेल्या सुमारे ७२ हजार ३५ विद्यार्थ्यांनी शुल्क भरून आपले प्रवेश निश्चित केले आहेत. आयटीआय प्रवेशासाठी १ लाख ८१ हजार ८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. परंतु सहाव्या आणि अखेरच्या गुणवत्ता यादीत ७२ हजार ३५१ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले आहेत. यानंतर रिक्त राहिलेल्या जागा भरण्यासाठी सातवी आणि आठवी फेरी राबविण्याचा निर्णय संचालनालयाने घेतला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी विकल्प अर्ज सादर केले असून, सातवी गुणवत्ता यादी ९ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता जाहीर करण्यात येणार आहे.या यादीनंतर आठवी गुणवत्ता यादी ११ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)