शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

बॉम्बच्या अफवेने रेल्वेस्थानक हादरले

By admin | Updated: August 20, 2014 00:13 IST

बॉम्बच्या अफवेने पुणो रेल्वे स्थानक आज हादरून गेले. सायंकाळी सातच्या सुमारास एका मोबाईलवरून आलेल्या निनावी कॉलमुळे पोलिसांची धावपळ उडाली.

पुणो : बॉम्बच्या अफवेने पुणो रेल्वे स्थानक आज हादरून गेले. सायंकाळी सातच्या सुमारास एका मोबाईलवरून आलेल्या निनावी कॉलमुळे पोलिसांची धावपळ उडाली. संपूर्ण रेल्वेस्थानक रिकामे करण्यात आले.  संपूर्ण स्थानकाच्या तपासणीनंतर ही केवळ अफवाच असल्याचे स्पष्ट झाले आणि सर्वानी नि:श्वास सोडला. तब्बल अडीच तास संपूर्ण वाहतूक व्यवस्था ठप्प पडली होती. 
काही आठवडय़ांपूर्वीच फरासखाना पोलीस ठाण्याबाहेर बॉम्बस्फोट घडल्याची घटना ताजी आहे. या पाश्र्वभूमीवर मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास पुणो पोलिसांना नियंत्रण कक्षात एका मोबाईलवरून रेल्वे स्थानकात बॉम्ब असल्याचा दूरध्वनी आला. नियंत्रण कक्षातून तातडीने रेल्वे स्थानक पोलिसांना याची माहिती देण्यात आली. त्यानुसार रेल्वे पोलिसांनी बॉम्बशोधक पथकाला कळविले. तोर्पयत रेल्वे पोलिसांनी स्थानकातील प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. स्थानकात केवळ दौंड पॅसेंजर उभी होती. तर पुणो-पटना एक्स्प्रेसला यार्डातच थांबवून ठेवण्यात आले. स्थानकातील सातही फलाटांवरील प्रवाशांना बाहेर पडण्याची सूचना देण्यात आली. बॉम्ब असल्याची माहिती कळताच प्रवाशांनी धावपळ सुरू केली. त्यामुळे गोंधळ उडाला. हळूहळू रेल्वे स्थानक रिकामे करण्यात आले. तोर्पयत ‘बीडीडीएस’चे पथक दाखल झाले होते. श्वानपथकातील दोघा श्वानांच्या मदतीने स्थानकावर उभ्या असलेल्या सर्व गाडय़ांची तपासणी केली. (प्रतिनिधी)
 
रेल्वे पोलीस व ‘बीडीडीएस’चे कर्मचारी स्थानकातील प्रत्येक फलाट, रेल्वे ट्रॅक पिंजून काढतात. रेल्वे स्थानकाचा परिसर व पार्किगचीही पाहणी करतात. या तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. दीड तासांच्या तपासणी मोहिमेनंतर केवळ बॉम्बची अफवा असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांसह प्रवाशांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला. त्यानंतर प्रवाशांना स्थानकात प्रवेश देण्यात आला. दरम्यान, या अफवेमुळे पुणो-पटना एक्स्प्रेससह काही गाडय़ांना विलंब झाल्याची माहिती रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली. दरम्यानच्या काळात पुणो रेल्वे स्थानकावर येणा:या गाडय़ा शिवाजीनगर, खडकी व हडपसर येथे थांबवून ठेवल्या होत्या.