शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 09:40 IST

Datta Dalvi - Eknath Shinde: गेल्या काही वर्षांपासून ठाकरे गटात दत्ता दळवी नाराज असल्याची वृत्ते येत होती. डावलले जात असले तरी शिंदेंनी शिवसेना फोडली तेव्हा देखील दळवी ठाकरेंसोबत राहिले होते.

२०२३ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भर सभेत शिवी घालणारे मुंबईचे माजी महापौर, ठाकरे गटाचे शिलेदार समजले जाणारे दत्ता दळवी हे शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत. गेल्या काही वर्षांपासून ठाकरे गटात दत्ता दळवी नाराज असल्याची वृत्ते येत होती. डावलले जात असले तरी शिंदेंनी शिवसेना फोडली तेव्हा देखील दळवी ठाकरेंसोबत राहिले होते. परंतू, आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर दत्ता दळवी शिंदे गटात सहभागी झाले आहेत. 

तळकोकणातील उद्धव ठाकरेंच्या शिलेदारांना एकेक करून शिवसेनेत घेतले जात आहे. काही महिन्यांपूर्वीच राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. आता मुळचे सिंधुदूर्गचे असलेले, मुंबई महापालिकेचे महापौर राहिलेले दत्ता दळवी यांना शिवसेनेत प्रवेश देण्यात आला आहे. 

महत्वाचे म्हणजे याच दत्ता दळवी यांनी २०२३ मध्ये भांडुपमध्ये ईशान्य मुंबईत राहणाऱ्या कोकणवासीयांचा जाहीर मेळाव्यात एकनाथ शिंदेंना शिवीगाळ केली होती. एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे राजस्थान प्रचारावेळी लावण्यात आलेल्या 'हिंदुह्रदयसम्राट' या उपमेवरून  ही शिविगाळ करण्यात आली होती. याविरोधात भांडूप पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात दत्ता दळवी यांना घरातून अटकही करण्यात आली होती. आता याच नेत्याला शिंदेंनी पक्षात घेतल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे आणि शिंदे गटात वर्चस्वावरून स्पर्धा रंगू लागली आहे. भाजपाने मुंबई महापालिकेत आपले चांगले बस्तान विस्तारलेले आहे. यामुळे शिंदे गटामध्ये धाकधुक आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यावरून चर्चा रंगली होती. दोन्ही ठाकरेंनी तशी विधाने केली होती. यावरूनही शिंदे गटात अस्वस्थता होती. दत्ता दळवी देखील मातोश्रीवरून डावलले जात असल्याने नाराज होते. कोकणपट्ट्यात मागील काही लोकसभा, विधानसभा निवडणुकीची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली होती. परंतू, गेल्या काही वर्षांपासून त्यांना डावलले जात होते. यावरून दळवींनी अनेकदा नाराजी व्यक्त केली होती. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे