शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 12:29 IST

जानेवारी ते मार्च या कालावधीत राज्यात एकूण ७६७ हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

Rahul Gandhi on Farmer Suicide: शेतकऱ्यांच्या आत्महत्या, हा महाराष्ट्राला लागलेला शाप आहे. दरवर्षी अनेक शेतकरी नापिकी, दुष्काळ आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करतात. आता याच मुद्द्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. 'सरकार शेतकऱ्यांचा नाही, तर श्रीमंतांचा विचार करते. मोदींनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार म्हटले होते, परंतु आज शेतकऱ्यांचे आयुष्य अर्धे होत चालले आहे,' अशी टीका राहुल यांनी केली.

काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या माहितीनुसार, जानेवारी ते मार्च या कालावधीत राज्यात एकूण ७०० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्या करणाऱ्या बहुतांश घटना विदर्भातील आहेत. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांबद्दल काँग्रेस आमदारांनी महाराष्ट्र सरकारला जाबही विचारला. काँग्रेस आमदारांनी सरकारने दिलेली १ लाख रुपयांची रक्कम वाढवण्याची मागणी केली आहे. 

३ महिन्यांत ७०० हून अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या राहुल गांधींनी सोशल मीडिया पोस्टद्वारे सरकारवर निशाणा साधताना म्हटले की, 'अवघ्या तीन महिन्यांत ७६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. हे फक्त आकडे नाहीत, तर ७६७ शेतकऱ्यांची उद्ध्वस्त घरे आहेत. ही अशी कुटुंबे आहेत, जी कधीही सावरू शकणार नाहीत. सरकार या प्रकरणात पूर्णपणे गप्प आहे. ते फक्त उदासीनतेने पाहत आहे.'

सरकारचे फक्त श्रीमंतांवर लक्ष 'शेतकरी दररोज कर्जात बुडत आहेत. बियाणे महाग आहेत, खते महाग आहेत, डिझेल महाग आहे. पण एमएसपीची कोणतीही हमी नाही. जेव्हा शेतकरी कर्जमाफीची मागणी करतात, तेव्हा त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जाते. पण मोदी सरकार श्रीमंतांचे करोडो रुपयांचे कर्ज सहजपणे माफ करते.' याचे उदाहरण देत त्यांनी अनिल अंबानींच्या ४८,००० कोटी रुपयांच्या एसबीआय फसवणुकीचा उल्लेख केला. 

सरकार शेतकऱ्यांना मारत आहेराहुल गांधी यांनी केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनांची आठवण करुन देत म्हटले की, 'मोदीजी म्हणाले होते की, ते शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करतील. शेतकरी आत्महत्यांच्या घटनांकडे पाहता, असा अंदाज लावता येतो की, उत्पन्न दुप्पट झाले नाही, तर शेतकऱ्यांचे आयुष्य निम्मे होत चालले आहे. ही व्यवस्था शेतकऱ्यांना शांतपणे आणि सतत मारत आहे. मोदीजी फक्त त्यांच्याच तमाशा पाहत आहेत,' अशी घणाघाती टीकाही राहुल यांनी केली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीfarmer suicideशेतकरी आत्महत्याcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी