शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

कसबा सांगावमधील सात कुटुंबे वाळीत

By admin | Updated: June 10, 2015 00:46 IST

मेंढे धनगर समाज : जातपंचायतीचा मानसिक त्रास

कोल्हापूर/कागल : कसबा सांगाव (ता. कागल) येथील मेंढे धनगर समाजातील सात कुटुंबांना त्याच समाजाने वाळीत टाकले आहे. जातपंचायतीच्या जाचक अटींमुळे ही कुटुंबे मेटाकुटीला आली असून, या जाचाविरुद्ध बंड करायचे त्यांनी ठरविले आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी सोमवारी कागलच्या तहसीलदारांची मुलाबाळांसह भेट घेऊन जातपंचायतीला पायबंद घालण्याची मागणी केली.तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना या कुटुंबीयांच्यावतीने निवेदन देण्यात आले. त्यावर शंकर नारायण पुजारी, मारुती नारायण पुजारी, धनपाल आप्पाजी पुजारी, रामचंद्र नारायण पुजारी, साऊबाई रामचंद्र पुजारी, अनिल पुजारी, श्रीपती पुजारी, आदींसह १७ नागरिकांच्या सह्णा आहेत. आपल्याच समाजातील देवाप्पा बाबूराव नायकवडे, मधुकर कोण्णे, बाळू कोण्णे, निगाप्पा बटू पुजारी, बाबासो देवाप्पा नायकवडे, महादेव दौलू हजारे, विठ्ठल रामू हजारे, बाळू किसन हजारे हे लोक जातपंचायतीच्या नावाखाली आमचा छळ करत असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात काही लोकांकडून जातपंचायतीच्या नावावर स्त्रिया आणि पुरुषांना नाहक त्रास दिला जात आहे. ही सात कुटुंबे २००७ पासून या गोष्टींचा त्रास सहन करत आहेत. परंतु, अलीकडच्या काळात या त्रासात वाढ झाली आहे. जातपंचायतीविरोधात महाराष्ट्रभर आवाज उठविला जात आहे. अनेक ठिकाणी अशा निष्ठूर लोकांना शिक्षाही झाली आहे. तरीही कसबा सांगावमध्ये आजही अशी वागणूक मिळते. तेव्हा संबंधितांवर कारवाई करण्यात यावी; अन्यथा आम्हाला माणूस म्हणून जगणेही अवघड होईल. आम्ही जातपंचायतीच्या विरोधात आवाज उठविल्याने या लोकांकडून आम्हाला त्रास अथवा जीविताला धोकाही होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने त्यांना वेळीच पायबंद घालावा.