शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 06:04 IST

ज्या ६८ तालुक्यांत बाजार समिती नाही किंवा जिथे उपबाजार आहे, अशा ६५ ठिकाणी नवी कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री बाजार समिती योजनेंतर्गत घेतला आहे. 

नारायण जाधवनवी मुंबई : राज्यातील ३५८ तालुक्यांमध्ये सध्या ३०५ कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत. त्यांचे ६२५ उपबाजार कार्यरत आहेत. राज्याच्या कृषी विकासात सहकारातून उभ्या राहिलेल्या बाजार समित्यांचे मोठे योगदान असूनही, अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत बाजार समित्या नाहीत. हे लक्षात घेऊन आता शासनाने राज्यात नव्याने ६५ कृषी उत्पन्न बाजार समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला  आहे.  यात सर्वाधिक २७ बाजार समित्या कोकणात असणार असून, कोकणच्या कृषी विकासाला मोठी चालना मिळणार आहे.

मुंबई कृषी  उत्पन्न बाजार समिती ही राज्यातील बाजार समित्यांची शिखर समिती आहे. शेतकऱ्यांचा शेतमाल ग्राहकांपर्यंत पोहोचवून त्याची एकाच ठिकाणी विक्री करता यावी, यासाठी राज्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांची स्थापना झाली. सहकारातून उभ्या असलेल्या या बाजार समित्यांवर सरकारचे नियंत्रण असते. यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक टळते. यामुळेच ज्या ६८ तालुक्यांत बाजार समिती नाही किंवा जिथे उपबाजार आहे, अशा ६५ ठिकाणी नवी कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री बाजार समिती योजनेंतर्गत घेतला आहे. 

सिंधुदुर्ग : कणकवली, वैभववाडी, देवगड, मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ले, दोडामार्गरत्नागिरी : संगमेश्वर, लांजा, राजापूर, चिपळूण, गुहागर, दापोली, मंडणगड, खेडरायगड : उरण, तळा, सुधागड-पाली, पोलादपूर, श्रीवर्धन, म्हसळाठाणे : अंबरनाथपालघर : तलासरी, जवाहर, मोखाडा, वाडा, विक्रमगडनाशिक : पेठ, त्र्यंबकेश्वरजळगाव : एरंडोल, मुक्ताईनगर, भडगावअमरावती : भातकुली, चिखलदरापुणे : वेल्हानागपूर : नागपूर ग्रामीणभंडारा : मोहाडी, साकोलीगोंदिया : सालेकसागडचिरोली : धानोरा, मुलचेरा, देसाईगंज, कुरखेडा, कोर्ची, एटापल्ली, भामरागडचंद्रपूर : बल्लारपूर, जिवतीनांदेड : अर्धापूरछ. संभाजीनगर : खुलताबाद, सोयगावबीड : शिरूर कासारसोलापूर : सोलापूर दक्षिणसातारा : महाबळेश्वरसांगली :  कवठेमहांकाळ, जत, कडेगावकोल्हापूर : पन्हाळा, शाहूवाडी, कागल, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड, चंदगड, आजरा

कोकणात ५, तर इतरत्र १५ एकर जागेची गरजसिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांतील बाजार समितींसाठी किमान ५ एकर तर उर्वरित महाराष्ट्रासाठी किमान १० ते १५ एकर जागेची आवश्यकता आहे. ती जागा शोधून नंतर संकुल बांधणे, पायाभूत सुविधा पुरवून मनुष्यबळाचे वेतन, भत्ते त्या-त्या बाजार समितीनेच करावयाचे आहेत.

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती