शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

५६० कर्मचारी ३६ महिन्यांपासून वेतनाविना

By admin | Updated: July 28, 2016 16:23 IST

शासनाने भू - विकास बँक बंद केल्याची घोषणा केली असून, या बँकेतील ५६० कर्मचारी ३६ महिन्यांपासून वेतनाविना आहे. या कर्मचाऱ्यांनी अन्य कार्यालयांमध्ये समायोजन मागणी केली आहे.

विवेक चांदूरकरबुलडाणा : शासनाने भू - विकास बँक बंद केल्याची घोषणा केली असून, या बँकेतील ५६० कर्मचारी ३६ महिन्यांपासून वेतनाविना आहे. या कर्मचाऱ्यांनी अन्य कार्यालयांमध्ये समायोजन मागणी केली आहे. मात्र, शासनाच्यावतीने कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

कधीकाळी राज्यात एक नंबर असलेली भू - विकास बँकेचे जाळे संपूर्ण राज्यात पसरले होते. मात्र, कालांतराने व्यावसायिक स्पर्धेत कमी पडल्यामुळे सदर बँक मागे पडली. भाजप व शिवसेनेच्या सरकारने भू - विकास बँक बंद करण्याची घोषणा केली. या बँकेत संपूर्ण राज्यात ५६० कर्मचारी आहेत. तसेच २५७१ कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. या कर्मचाऱ्यांना ३६ महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. ५६० कर्मचाऱ्यांचे शासनाने १७४ कोटींचे वेतन थकीत आहे तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे १८० कोटी शासनाला देणे आहे. शासनाने शेतकऱ्यांकडे थकीत असलेले कर्ज वसूल करून वेतन घेण्याचे आदेश दिले आहेत.

दुसरीकडे बँक बंद झाल्याच्या घोषणेमुळे शेतकरी थकीत कर्ज देण्यास तयार नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. २५७१ कर्मचारी वेतनाविनाच सेवानिवृत्त झाले आहे. यापैकी काही कर्मचाऱ्यांचा मृत्यूही झाला आहे. वेतन देण्याच्या मागणीकरिता तसेच अन्य खात्यात समायोजन न केल्यास आत्मदहन करण्याचा इशाराही कर्मचाऱ्यांच्यावतीने देण्यात आला होता. तसेच काही कर्मचाऱ्यांनी इच्छामरणाची परवानगी मागितली होती. त्यानंतरही शासनाने कोणतीही दखल घेतली नाही. कर्मचाऱ्यांनी अनेकदा आंदोलने केल्यावरही शासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याने कर्मचारी त्रस्त झाले आहेत.आमदारांच्या पत्रांना केराची टोपलीभू - विकास बँकांमधील कर्मचाऱ्यांना वेतन देवून त्यांचे अन्य खात्यात समायोजन करण्याची मागणी बुलडाण्याचे आ. हर्षवर्धन सपकाळ, चिखलीचे आ. राहूल बोंद्रे व आ. डॉ. संजय कुटे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. यावर विधानभवनात अनेकदा आमदारांच्यावतीने आवाजही उठविण्यात आला आहे. मात्र,त्यानंतरही याप्रकरणी कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली. तर विरोधी व सत्ताधारी पक्षातील आमदारांच्याच पत्रांना केराची टोपली दाखविण्यात आली.- आमचे ३६ महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. शासनाने बँक बंद झाल्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे आम्हाला वुसली करण्याचे सांगत आहेत. राज्यातील ५६० कर्मचारी तसेच २५७१ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी आलीआहे. शासनाने बँकेतील कर्मचाऱ्यांचे अन्य खात्यात समायोजन करायला हवे.- ए. एस. जाधव, शाखा व्यवस्थापक, भू - विकास बँक, बुलडाणा.