शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळासाठी ५५0 हेक्टर जमीन

By admin | Updated: October 8, 2014 03:24 IST

आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी संपादित करण्यात येणा-या १० गावांतील ६७१ हेक्टरपैकी ५५0 हेक्टर जमिनीची संमतीपत्रे जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली आहेत.

कमलाकर कांबळे , नवी मुंबईआंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी संपादित करण्यात येणा-या १० गावांतील ६७१ हेक्टरपैकी ५५0 हेक्टर जमिनीची संमतीपत्रे जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली आहेत. डिसेंबर अखेरपर्यंत उर्वरित सर्व जमिनी संपादित करून विमानतळ उभारणीसाठी त्या सिडकोच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. देशातील पहिले ग्रीन फिल्ड विमानतळ म्हणून नवी मुंबई विमानतळाची उभारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी जवळपास २,२२६ हेक्टर जागा लागणार आहे. यापैकी सिडकोच्या ताब्यात १५७२ हेक्टर जागा आहे. तर १० गावांतून उर्वरित ६७१ हेक्टर जागा संपादित करण्यात येणार आहे. संपादित होणाऱ्या शेतीच्या ६५६ हेक्टर जमिनीपैकी ६ आॅक्टोबरपर्यंत ५५0 हेक्टर जमिनीची संमतीपत्रे जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली आहेत. तर ८ गावठाणांपैकी ५ गावठाणांतील संपूर्ण घरांची संमतीपत्रे मिळाली आहेत. उर्वरित ३ संमतीपत्रे घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती भूसंपादन अधिकारी रेवती गायकर यांनी ‘लोकमत’ला दिली. विमानळासाठी लागणाऱ्या जमिनीच्या संपादनासाठी संमतीपत्रे देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना सिडकोच्या २२.५ टक्के भूखंडासह इतर आकर्षक योजनांचा समावेश असलेल्या पुनर्वसन पॅकेजचा लाभ मिळणार आहे. मात्र जे ग्रामस्थ संमतीपत्रे देणार नाहीत, त्यांना केंद्र शासनाच्या नवीन भूसंपादन कायद्यानुसार (लार) जमिनीचा मोबदला मिळणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काही गावांना संमतीपत्रे सादर करण्यासाठी देण्यात आलेली मुदत ६ आॅक्टोबर रोजी संपुष्टात आली. त्यामुळे ज्यांनी या मुदतीच्या आत संमतीपत्रे सादर केली नाहीत त्यांना आता लारच्या धोरणानुसार खूपच कमी आर्थिक मोबदला स्वीकारावा लागणार आहे. त्यामुळे अशा ग्रामस्थांनी आपली संमतीपत्रे तातडीने सादर करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी केले आहे.