शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
2
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
3
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
4
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
5
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
6
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
7
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
8
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
9
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
10
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
12
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
13
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
14
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
15
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
16
प्रेमाचं नाटक, लग्नाचं आमिष आणि त्यानंतर...; मोहम्मद शमीच्या भावावर गंभीर आरोप
17
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
18
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
19
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
20
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात कोविडचे ४९४ सक्रिय रुग्ण, काय काळजी घ्याल?; आरोग्य विभागाने केलं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 19:39 IST

कोविड रुग्णांची तुरळक वाढ फक्त महाराष्ट्रात नव्हे, तर इतर राज्यात तसेच काही इतर देशात देखील दिसून येत आहे.

मुंबई - राज्यात सध्या काही रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळून येत असून सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कोविड तपासणी व उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी असं आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. राज्यात सध्या ४९४ इतके सक्रिय कोविड रुग्ण आहेत. 
            
कोविड हा आजार विषाणूमुळे होणारा आजार आहे. सद्यस्थितीत कोविडसाठी राज्यात आयएलआय (इन्फ्लूएंझा सारखा आजार) आणि एसएआरआय (गंभीर तीव्र श्वसन संसर्ग) सर्वेक्षण चालू आहे. त्या सर्वेक्षणामध्ये अशा रुग्णांची कोविडसाठी चाचणी केली जाते. रुग्ण कोविड पॉझिटिव्ह आढळल्यानंतर नियमित उपचार केले जात आहेत. राज्यात सध्या कोविड केसेस तुरळक आहेत. 

जानेवारी २०२५ पासून १२ हजार ११ रुग्णांची कोविड चाचणी केली असून त्यापैकी ८७३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून आतापर्यंत ३६९ रुग्ण बरे झाले आहेत. याबाबत आरोग्य आरोग्य विभागाने जाहीर केलेली माहिती :

०२ जून २०२५ रोजी पॉझिटिव्ह रुग्ण – ५९ (मुंबई-२०, ठाणे-४, पुणे-१, पुणे मनपा-१७, पिंपरी चिंचवड मनपा - २, सातारा - २, कोल्हापूर मनपा - २, सांगली मनपा - १, छत्रपती संभाजीनगर - १, छत्रपती संभाजीनगर मनपा - ७, अकोला मनपा - २)

२ जून २०२५ रोजी सक्रिय असलेले रुग्ण – ४९४

जानेवारी २०२५ पासून मुंबई मधील एकूण रुग्ण संख्या - ४८३ (जानेवारी - १, फेब्रुवारी १, मार्च- ०, एप्रिल- ४, मे - ४७७)   

निदान झालेल्या सर्व रुग्णांत सौम्य स्वरूपाची लक्षणे आहेत. जानेवारी २०२५ पासून आजपर्यंत सहव्याधीने ग्रस्त असलेले ९ व इतर १ असे एकूण १० रुग्ण दगावले आहेत. यापैकी एका रुग्णास नेफ्रोटिक सिंड्रोम सह हायपोकॅल्सिमिक सीझर होते व दुसऱ्या रुग्णास कर्करोग होता. तिसऱ्या रुग्णास ब्रेन स्ट्रोक झाला होता आणि फिट येत होती. चौथ्या रुग्णास डायबेटिक किटोएसिडोसिस आजार होता. पाचव्या रुग्णास आयएलडी होता. सहाव्या रुग्णास डायबेटीस होता व २०१४ पासून अर्धांगवायू झालेला होता. सातव्या रुग्णास सीवीअर एआरडीएस विथ डायलेटेड एओटिक रीगर्जिटेशन हा आजार होता. आठव्या रुग्णास मधुमेह आणि नवव्या रुग्णास मधुमेह व उच्च रक्तदाब होता व इतरमध्ये ४७ वर्षीय महिला असून, महिलेस ताप आणि धाप लागणे ही लक्षणे होती.  

कोविड रुग्णांची तुरळक वाढ फक्त महाराष्ट्रात नव्हे, तर इतर राज्यात तसेच काही इतर देशात देखील दिसून येत आहे. फ्लूसदृश्य आजार व एसएआरआय (तीव्र श्वसन दाह असलेले रुग्ण) यांचे आरोग्य विभागामार्फत नियमित सर्वेक्षण सुरू आहे. तसेच तीव्र श्वसनदाह असलेल्या सर्व रुग्णांचे कोविड-१९ या आजारासाठी आरटीपीसीआर चाचणी करण्यात येते. तसेच फ्लू-सदृश आजार असलेल्या रुग्णांपैकी ५ % रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत आहे. सर्व आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आलेले नमुने संपूर्ण जिनोम सिक्वेन्सिंगसाठी एन आय व्ही, पुणे व बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे व राज्यातील इतर प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येतात. जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मनपा यांचे स्तरावर कोविड 19 साथरोग संदर्भात पूर्वतयारीचा आढावा विभागीय स्तरावर घेण्यात येत असून त्यामध्ये सर्व यंत्रणेला रुग्णालये सुसज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर, आरटीपीसीआर चाचणी, ऑक्सिजन बेड, आयसीयू बेड, व्हेंटिलेटर बेड व ऑक्सिजन उपलब्धतेबाबत सर्व तयारी ठेवण्यासंदर्भात जिल्ह्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. 

नागरिकांनी घाबरून जाऊ नये, काळजी घ्यावी
            

खोकताना व शिंकताना रूमालाचा वापर करावा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. सर्दी, ताप, खोकला, घसादुखी, धाप लागणे इत्यादी लक्षणे असल्यास त्वरित जवळच्या शासकीय रुग्णालयास संपर्क साधून र्मोफत उपचार व आवश्यक तपासण्या करून घ्याव्यात. अशा प्रकारची लक्षणे, इतर आजाराने व्याधीग्रस्त लोकांमध्ये आढळून आल्यास विशेष दक्षता घेण्यात यावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.
 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या