भिवंडीतील नाल्यात सापडली ४९१ काडतुसे

By Admin | Updated: May 25, 2014 05:39 IST2014-05-25T05:39:55+5:302014-05-25T05:39:55+5:30

शनिवारी सकाळी शहरात महानगरपालिकेच्या नाल्याची सफाई सुरू असताना बहात्तरगाळ्याजवळील सीताबाई कम्पाउंड येथे ४९१ काडतुसे मजुरांना सापडली आहेत.

491 cartridges found in nullah in Bhiwandi | भिवंडीतील नाल्यात सापडली ४९१ काडतुसे

भिवंडीतील नाल्यात सापडली ४९१ काडतुसे

भिवंडी : शनिवारी सकाळी शहरात महानगरपालिकेच्या नाल्याची सफाई सुरू असताना बहात्तरगाळ्याजवळील सीताबाई कम्पाउंड येथे ४९१ काडतुसे मजुरांना सापडली आहेत. एकाच ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने काडतुसे सापडल्याने गुन्हेगारांची माहिती घेऊन त्यांच्यावर पोलिसांनी अंकुश ठेवण्याची मागणी होत आहे. नारपोली भागातील सीताबाई कम्पाउंड येथे ठेकेदारामार्फत नालेसफाई सुरू असताना नाल्यात उतरलेला मजूर मुनीर अबू ताहिर याला एकाच ठिकाणी फेकलेली काडतुसे सापडली. याची खबर नारपोली पोलीस ठाण्यास मिळाली असता गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक संजय सातव यांनी काडतुसे ताब्यात घेतली. त्यात ९० काडतुसे वापरलेली व ४०१ काडतुसे जिवंत सापडल्याचे सातव यांनी सांगितले. या प्रकरणी नारपोली पोलिसांत गुन्हा दाखल झाला. लोकसभा निवडणुका पार पडल्यावर काडतुसांचा साठा नाल्यात सापडतो, हे गुन्हेगारांनी पोलिसांना दिलेले आव्हान असून कठोर तपासाची मागणी नागरिक करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: 491 cartridges found in nullah in Bhiwandi