४७ शिक्षकांना जामीन; १२ हर्सूल कारागृहात

By Admin | Updated: October 11, 2016 05:35 IST2016-10-11T05:35:40+5:302016-10-11T05:35:40+5:30

पोलिसांवर दगडफेक करण्याच्या आरोपाखाली हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आलेल्या ४७ मोर्चेकरी शिक्षकांना जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी

47 teachers get bail; 12 Hersaul Jail | ४७ शिक्षकांना जामीन; १२ हर्सूल कारागृहात

४७ शिक्षकांना जामीन; १२ हर्सूल कारागृहात

औरंगाबाद : पोलिसांवर दगडफेक करण्याच्या आरोपाखाली हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आलेल्या ४७ मोर्चेकरी शिक्षकांना जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी सोमवारी प्रत्येकी ५ हजार रुपयांचा जात मुचलका आणि प्रत्येकी ५ हजार रुपयाच्या बाँडवर सशर्त अंतरिम जामीन मंजूर केला, तर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. जी. एम. शेख यांनी १२ शिक्षकांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. कोठडी सुनावलेल्या शिक्षकांची रात्री उशिरा हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली.
मंत्रिमंडळाच्या बैठकीवर विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांनी मोर्चा काढला होता. मोर्चा आमखास मैदानावर आल्यानंतर पोलिसांवर दगडफेक करण्यात आली होती. पोलिसांनी ५९ जणांना त्याच दिवशी अटक केली होती. त्यापैकी १२ शिक्षकांना १० आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी, तर ४७ शिक्षकांची न्यायालयीन कोठडीत हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली होती. ४७ शिक्षकांना ५ आॅक्टोबरला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यांनी ६ आॅक्टोबरला नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. सोमवारी या अर्जावर सुनावणी झाली. (प्रतिनिधी)

Web Title: 47 teachers get bail; 12 Hersaul Jail