विदर्भात होणार २२ नवीन आरोग्य संस्था

By Admin | Updated: June 15, 2014 00:33 IST2014-06-15T00:33:32+5:302014-06-15T00:33:32+5:30

आरोग्य विभागाने २००१ च्या लोकसंख्येवर आधारित राज्यात आरोग्य संस्था स्थापनेबाबतच्या मंजूर बृहत आराखड्यामध्ये विदर्भातील पाच जिल्ह्यात नवीन प्राथमिक उपकेंद्र १०, प्राथमिक आरोग्य केंद्र ९,

22 new health institutes will be going to Vidarbha | विदर्भात होणार २२ नवीन आरोग्य संस्था

विदर्भात होणार २२ नवीन आरोग्य संस्था

राज्य शासनाची हिरवी झेंडी : पाच जिल्ह्यांचा समावेश
अमरावती : आरोग्य विभागाने २००१ च्या लोकसंख्येवर आधारित राज्यात आरोग्य संस्था स्थापनेबाबतच्या मंजूर बृहत आराखड्यामध्ये विदर्भातील पाच जिल्ह्यात नवीन प्राथमिक उपकेंद्र १०, प्राथमिक आरोग्य केंद्र ९, ग्रामीण रुग्णालय १ आणि ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन केलेले १ व ३०० खाटांच्या स्त्री रुग्णालयाचे ५०० खाटांमध्ये श्रेणीवर्धन केले आहे.
या बृहत आराखड्यात विदर्भासह राज्यात एकूण ५६ रुग्णालयांचे श्रेणीवर्धन, १२५२ नवीन आरोग्य संस्था आणि ज्या आरोग्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात लोकसंख्या वाढलेली आहे, अशा ठिकाणच्या आरोग्य संस्थांमध्ये ८०१२ इतके वाढीव मनुष्यबळ मंजूर केले आहे. आरोग्य सेवा संचालकांच्या अध्यक्षतेखाली समितीने तयार केलेल्या अहवालानुसार आणि लोकप्रतिनिधींच्या आग्रही मागण्या लक्षात घेऊन विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात ७ आणि यवतमाळ जिल्ह्यात ३ नवीन आरोग्य उपकेंद्र मंजूर केले आहेत. याशिवाय अमरावती, गोंदिया व यवतमाळ जिल्ह्यात प्रत्येकी १, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात प्रत्येक ३, असे नऊ प्राथमिक आरोग्य केंद्र नव्याने स्थापन केले जाणार आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात एक नवीन ग्रामीण रुग्णालय, गडचिरोलीत ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे ५० खाटांमध्ये श्रेणीवर्धन करुन उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा दिला जाणार आहे. नागपूर शहरातील ३०० खाटांच्या डागा स्मृती स्त्री रूग्णालयाचे ५०० खाटांमध्ये श्रेणीवर्धन केले जाणार आहे.
ही आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र
बृहत आराखड्यानुसार नव्याने मंजूर प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात कांडली, गडचिरोलीतील एटापल्ली-बुरगी कादोडी, चार्मोशी, लखमापूर, बोरी, भामरागड-कोठी, गोंदिया जिल्ह्यातील सडकअर्जूनी,चिखली, चंद्रपूर जिल्ह्यात बीबी, भंगाराम तळोधी, विरुर स्टेशन, यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यात बोधेगाव अशा नऊ ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्यात येणार आहे.
घुग्गुस येथे ग्रामीण तर धानोऱ्यात उपजिल्हा रुग्णालय
चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस येथे नवीन ग्रामीण रुग्णालय आणि गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा येथे ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन केले जाणार आहे.
नागपुरात ५०० खाटांचे स्त्री श्रेणीवर्धन रुग्णालय
राज्य शासनाने २००१ च्या लोकसंख्येनुसार आरोग्य विभागाचा बृहत आराखड्यात राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरातील ३०० खाटा असलेले डागा स्मृती स्त्री रुग्णालयाचे ५०० खाटांच्या स्त्री रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यास मान्यता दिली आहे.

Web Title: 22 new health institutes will be going to Vidarbha