शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

५० खोकेनंतर आता 'डिफेंडर'ची चर्चा; एकाच ठेकेदाराकडून आमदारांना २१ आलिशान गाड्या भेट; काँग्रेसचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 10:20 IST

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यातील २१ आमदारांना आलिशान गाड्या मिळाल्याचा दावा केला आहे.

Harshvardhan Sapkal on Defender: बुलढाणा शहरातील शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची तब्बल दोन कोटी रुपयांची 'डिफेंडर' कार सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे. एका आमदाराकडे असलेल्या या आलिशान कारचा वाद विरोधकांनी नव्हे, तर महायुतीच्याच एका नेत्याने उकरून काढला आहे. यामुळे बुलढाणा जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. त्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक खळबळजनक आरोप केला आहे. राज्यात एका ठेकेदाराकडून २१ आमदारांना डिफेंडर गाड्या भेट देण्यात आल्याचे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

बुलढाणा भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय शिंदे यांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केला. गायकवाड यांनी ही महागडी डिफेंडर कार एका कंत्राटदाराकडून कमिशन म्हणून घेतल्याचा आरोप त्यांनी केला.  या आरोपांवर आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले आहे. ही कार आपली नसून एका नातेवाईकाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आपल्यावर राजकीय आकसापोटी आणि चुकीचे आरोप केले जात आहेत, असा पलटवारही त्यांनी केला आहे.

दुसरीकडे, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्रातील सत्ताधारी आमदारांवर थेट आरोप केला आहे. सपकाळ यांच्या म्हणण्यानुसार, राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या २१ आमदारांना एकाच ठेकेदाराकडून डिफेंडर गाड्या भेट म्हणून देण्यात आल्या आहेत.

"मागच्या काळात राज्यात ५० खोके एकदम ओके अशी घोषणाबाजी झाली होती. तसाच प्रकार आता होताना दिसत आहे. दिवाळीचे फटाके फुटत असताना महाराष्ट्रातील सत्ताधारी आमदारांना २१ डिफेंडर गाड्या एका ठेकेदाराने गिफ्ट केल्या आहेत. आता ते २१ आमदार आणि गिफ्ट देणारा ठेकेदार कोण हा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे. याचे उत्तर लवकरच महाराष्ट्राला मिळेल. बुलढाण्यातील गाडी २१ वी आहे की २२ वी हे शोधायला हवं," असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

"आपण लोकशाहीमध्ये राहतो. आमदार खासदार हे लोकांचे प्रतिनिधी आहेत. देशाची राज्याची ग्रामसभा होऊ शकत नाही म्हणून तो पाठवलेला एक प्रतिनिधी आहे. त्याने प्रतिनिधी सारखं राहावं. विनाकारण विविध स्टिकर्स चिकटवून किंवा पोलिसांचा लवाजमा घेऊन फिरणं चुकीचे आहे. मी देखील आमदार होतो पण माझ्या कोणत्याच गाडीवर आमदाराचे स्टिकर्स नव्हते," असेही सपकाळ म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : After '50 Boxes', 'Defender' cars in discussion; Congress alleges gifts.

Web Summary : Congress alleges 21 MLAs received Defender cars from a contractor. BJP leader accused MLA Gaikwad of accepting a car as commission. Gaikwad denies ownership, calling it a relative's car and political revenge. Sapkal criticizes lavish displays by representatives.
टॅग्स :Harshavardhana Sapkalहर्षवर्धन सपकाळEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcongressकाँग्रेस