शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

११९ कोटींचा घोटाळा

By admin | Updated: February 25, 2015 02:04 IST

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नागपूर विभागात झालेल्या ११९ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

यदु जोशी, मुंबईसार्वजनिक बांधकाम खात्याच्या नागपूर विभागात झालेल्या ११९ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. एकूण ३४ अधिकारी या घोटाळ्यामध्ये अडकले होते. त्यातील २४ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. तर ३ अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. ‘रामगिरी’ हे मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान, ‘देवगिरी’ हे उपमुख्यमंत्र्यांचे निवासस्थान, मंत्र्यांचे कॉटेज असलेले ‘रवी भवन’ आणि ‘आमदार निवास’ यांसह विविध ठिकाणच्या बांधकामांमध्ये कोट्यवधी च्या घोटाळ्यांचे हे प्रकरण होते. एकाच प्रकारची कामे वारंवार करणे, कामे न करता बिले उचलणे, कामांचे प्राकलन अव्वाच्या सव्वा फुगवणे, विशिष्ट कंत्राटदारांना कंत्राट मिळवून देणे आदी अनेक प्रकारचे गैरव्यवहार करण्यात आले होते. २००५ ते २०१० या काळात हे घोटाळे झाले होते. नागपूर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने या घोटाळ्यांबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका आधीच दाखल केली आहे. या घोटाळ्यात शासनाने कोणती कारवाई संबंधित अभियंत्यांवर केली, यासंबंधीचा अ‍ॅक्शन टेकन रिपोर्ट आज उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात येणार आहे. सामाजिक कार्यकर्ते मोहन कारेमोरे यांनी हस्तक्षेप याचिका दाखल करून सदर प्रकरणाची व्याप्ती मोठी असून जामवरोरा मार्गासह ग्रामीण भागातील इतर अनेक कामांमध्ये घोटाळे झाल्याचे म्हटले आहे.