शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी तारखा जाहीर; यंदा असणार 'असा' बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 19:21 IST

Maharashtra Board Exam: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दहावी-बारावीच्या परीक्षेबाबत मोठी घोषणा केली आहे.

SSC-HSC Exam TimeTable :महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. दहावी-बारावीच्या परीक्षेच्या तारखा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील परीक्षांच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या कालावधीमध्ये यावेळी दहा दिवसांचा फरक असणार आहे. यानुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ऐवजी ११ फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा १ मार्च ऐवजी २० मार्चपासून घेण्यात येणार आहे.

बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या काळात होणार आहे. तर, दहावीची परीक्षा  २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या काळात होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने प्रसिद्धीपत्रक जारी करुन दिली आहे. यासोबत राज्य शिक्षण मंडळाकडून हरकती आणि सूचना पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करता यावे यादृष्टीने या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

निकालानंतर विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया महत्त्वाची असते. तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा या मंडळाच्या परीक्षेनंतर आयोजित केल्या जातात. त्यामुळे या परीक्षांचा अभ्यास करण्यास विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळायला हवा तसेच पुरवणी परीक्षा लवकर घेवून त्याचा निकाल लवकर लागायला हवा यासर्व बाबींचा विचार करुन २०२४-२५ ची शैक्षणिक वर्षात होणारी दहावी-बारावीची परीक्षेच्या कालवधीत मोठा बदल करण्यात आलाय. एबीपी माझाच्या वृत्तानुसार, फेब्रुवारी-मार्चमध्ये होणारी दहावी आणि बारावीची परीक्षा नेहमीपेक्षा १८ ते १० दिवस घेण्याचा राज्य मंडळाचा मानस आहे.

असं असणार वेळापत्रक

बारावीची परीक्षा - मंगळवार, 11 फेब्रुवारी २०२५ ते मंगळवार, १८ मार्च २०२५

प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन : शुक्रवार, २४ जानेवारी २०२५ ते सोमवार १० फेब्रुवारी २०२५

दहावीची परीक्षा : शुक्रवार, २१ फेब्रुवारी २०२५ ते सोमवार १७ मार्च २०२५

प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन :  सोमवार ३ फेब्रुवारी २०२५ ते गुरूवार २० फेब्रुवारी २०२५

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रssc examदहावीHSC / 12th Exam12वी परीक्षा