१० साहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2015 23:20 IST2015-09-19T23:20:48+5:302015-09-19T23:20:48+5:30

राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या १० साहाय्यक आयुक्त/उपअधीक्षकांच्या विविध घटकांमध्ये बदल्या करण्यात आल्या आहेत. यापैकी ४ अधिकाऱ्यांचा परिविक्षाधीन कालावधी

10 Assistant Police Commissioner's Transfers | १० साहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्या

१० साहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्या

मुंबई : राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या १० साहाय्यक आयुक्त/उपअधीक्षकांच्या विविध घटकांमध्ये बदल्या करण्यात आल्या आहेत. यापैकी ४ अधिकाऱ्यांचा परिविक्षाधीन कालावधी पूर्ण झाल्याने त्यांची नियमित स्वरूपात नियुक्ती करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१च्या कलम २२ (न), (२)च्या तरतुदीनुसार या बदल्या करण्यात आलेल्या असून, मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या मंजुरीनंतर त्याबाबतचे आदेश बजाविण्यात आले आहेत, असे गृहविभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.
अधिकाऱ्यांची नावे अशी : (कंसात कोठून - कोठे)
माधुरी कांगणे (मनमाड लोहमार्ग-राज्य महामार्ग, पुणे), भरत गायकवाड (शाहूवाडी-मुंबई), विजय मुकणे (केज, बीड-मुंबई), नीलेश सोनावणे े(मिरज-अंबड, जालना), धीरज पाटील (कर्जत, अहमदनगर-मिरज), चंद्रकांत अलसटवार (पैठण-मुख्यालय, औरंगाबाद ग्रामीण), परिविक्षाधीन अधिकारी डॉ. शीतल जानवे (यवतमाळ-रत्नागिरी मुख्यालय), सूरज गुरव (नांदेड-शाहुवाडी, कोल्हापूर), सोमनाथ वाघचौरे (गोंदिया-नागपूर शहर), आरती बनसोडे (सांगली-केज, बीड).

Web Title: 10 Assistant Police Commissioner's Transfers