निराधार महिलेच्या मदतीला धावली तरुणाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:15 IST2021-05-28T04:15:33+5:302021-05-28T04:15:33+5:30

सुशीला आनंद गुरवानी या आपले पती आनंद गिरवानी यांच्यासह उदरनिर्वाह भागविण्यासाठी १५ वर्षांपूर्वी औराद येथे मोलमजुरी करण्यासाठी ...

Youth rushed to the aid of a destitute woman | निराधार महिलेच्या मदतीला धावली तरुणाई

निराधार महिलेच्या मदतीला धावली तरुणाई

सुशीला आनंद गुरवानी या आपले पती आनंद गिरवानी यांच्यासह उदरनिर्वाह भागविण्यासाठी १५ वर्षांपूर्वी औराद येथे मोलमजुरी करण्यासाठी आल्या होत्या. ८ वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे निधन झाल्याने मोलमजुरी करून त्या आपली उपजीविका भागवत होत्या. गेल्या वर्षापासून सुरू झालेल्या कोरोनाच्या संकटामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ लागली. यात कशीबशी गुजराण करीत होत्या. त्यातच शेजारी असलेल्यांनी त्यांना मदतीचा हात देत आवश्यक सुविधा पुरविल्या. मात्र, तीन महिन्यांपासून त्यांची प्रकृती बिघडल्याने गैरसोय होत होती. दरम्यान, ही बाब राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सिद्दिक मुल्ला यांना समजताच त्यांनी स्वतः पुढे येत डॉ. गौस शेख यांना बोलावून निराधार महिलेवर उपचार सुरू केले. डॉ. गौस यांनी निलंगा उपजिल्हा रुग्णालय येथे संपर्क साधून सदर महिलेच्या उपचाराची सोय केली. याकामी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी मदत केली. या महिलेची प्रकृती बरी झाल्यानंतर सिद्दिक मुल्ला यांनी औराद येथे महिलेच्या राहत्या घरी व्यवस्था केली. या कठीण काळात शेजारी महिला रुक्साना शेख, मालनबी शेख, आशाबाई हणमंते, सुरेखा कांबळे, शिल्पा घंटे या महिलांनी स्वत:च्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे त्यांची काळजी घेतली. मदतीसाठी डॉ. गौस, सिद्दिक मुल्ला, सुनील सांडवे, इबु कुरेशी, अहमद मुल्ला, सतीश कांबळे, केरबा अमले, माणिक पांचाळ, प्रशांत मेहेत्रे, अयुब शेख, असलम शेख, अब्रार पटेल, फेरोज निटूरे यांनी सहकार्य केले.

Web Title: Youth rushed to the aid of a destitute woman