कोरोनाच्या संकटात जिल्हा परिषदेचे काम अधिक सक्षम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:21 IST2021-04-28T04:21:28+5:302021-04-28T04:21:28+5:30

१२ नंबर पाटी येथील कोविड डेडिकेटेड हॉस्पिटलला भेट देऊन तेथील रुग्णांशी अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी संवाद साधला. यावेळी उपाध्यक्षा ...

The work of the Zilla Parishad is more capable in the crisis of Corona | कोरोनाच्या संकटात जिल्हा परिषदेचे काम अधिक सक्षम

कोरोनाच्या संकटात जिल्हा परिषदेचे काम अधिक सक्षम

१२ नंबर पाटी येथील कोविड डेडिकेटेड हॉस्पिटलला भेट देऊन तेथील रुग्णांशी अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी संवाद साधला. यावेळी उपाध्यक्षा भारतबाई साळुंके, चेअरमन दगडू साळुंके, माजी कृषी सभापती बापूराव राठोड, भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रा. पंडित सूर्यवंशी, भाजप जिल्हा सरचिटणीस प्रमोद मुदाले, आदी उपस्थित होते.

जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली हे हॉस्पिटल सुरू आहे. येथे ११८ रुग्ण दाखल असून, त्यातील काहीजण उपचारानंतर कोरोनामुक्त झाल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी सांगितले.

मानसिकता खचू देऊ नका...

कोरोना रुग्णांच्या समस्या जाणून घेत अध्यक्ष केंद्रे म्हणाले, कोरोनाच्या संसर्गामुळे घाबरू नये. मानसिकता खचू देऊ नये. आम्ही तुमच्यासोबत आहोत. आरोग्याच्या सोयी-सुविधा जिल्हा परिषदेमार्फत पुरविण्यात येतील. जिल्हा परिषदेचे सर्व वैद्यकीय अधिकारी, नोडल अधिकारी, आरोग्य कर्मचारी हे आपला जीव धोक्यात घालून समर्पण भावनेने रुग्णांना सेवा देत आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांनीही आपली व कुटुंबाची काळजी घ्यावी, असेही ते म्हणाले.

Web Title: The work of the Zilla Parishad is more capable in the crisis of Corona