महाराष्ट्र विद्यालयात महिलांचा गौरव सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:59 IST2021-01-08T04:59:47+5:302021-01-08T04:59:47+5:30

... क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी औराद शहाजानी : हुलसूर येथील श्री संत रघुनाथ महाराज शाळा, श्री वीरभद्रेश्वर शाळा, ...

Women's Pride Ceremony at Maharashtra Vidyalaya | महाराष्ट्र विद्यालयात महिलांचा गौरव सोहळा

महाराष्ट्र विद्यालयात महिलांचा गौरव सोहळा

...

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

औराद शहाजानी : हुलसूर येथील श्री संत रघुनाथ महाराज शाळा, श्री वीरभद्रेश्वर शाळा, ग्रामपंचायत आणि सरकारी आदर्श प्राथमिक शाळा, सायगाव येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक बस्वराज बिरादार, सुधाकर सागावे, राजकुमार पाटील, रामदास वांजरे, मीरा बालूरकर, उषादेवी पाटील, चंद्रनायक पवार, महादेव सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

...

संत सावता माळी मंदिरात कार्यक्रम

बेलकुंड : औसा तालुक्यातील मातोळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी संत सावता माळी मंदिरात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली. यावेळी पूजा गोरे, सानिका गोरे, राधिका मुळे, जान्हवी भोसले, सावली गोरे, संकेत गोरे, सायली भोसले, प्रतीक्षा भोसले, विराज भोसले, विवेक भोसले आदी उपस्थित होते.

...

हेर येथे जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम

उदगीर : तालुक्यातील हेर येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी तंटामुक्तीचे अध्यक्ष बळवंत घोगरे, विलास कारखान्याचे संचालक पंडित ढगे, डॉ. मंगेश हेरकर, अविनाश सोनकांबळे, वसंत ढगे, महेश गुरुडे, राम माटेकर, प्रभू सूर्यकर, सुधाकर सूर्यकर आदींची उपस्थिती होती.

...

Web Title: Women's Pride Ceremony at Maharashtra Vidyalaya