शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस तपास कामात महिला अधिकारी सरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:24 IST

लातूर : महिलांचे घर व्यवस्थापनातले दिव्य आहेच. शिवाय आता त्यांनी समाज जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात झेप घेतली असून, संधी मिळाल्यानंतर ...

लातूर : महिलांचे घर व्यवस्थापनातले दिव्य आहेच. शिवाय आता त्यांनी समाज जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात झेप घेतली असून, संधी मिळाल्यानंतर कर्तृत्व सिद्ध करून दाखवले आहे. पोलीस तपासाच्या कामातही महिला अधिकारी सरस कामगिरी बजावत आहेत. बहुचर्चित अनेेक गुन्ह्यांच्या तपासातून त्यांनी हे दाखवून दिले आहे, असे गौरवोद्गार नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी येथे बुधवारी काढले. ‘लोकमत’च्यावतीने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान व ‘वुमन ॲचिव्हर्स ऑफ लातूर २०२१’ बुकच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निखील पिंगळे, सिनेअभिनेत्री शिल्पा तुळसकर, ‘लोकमत’चे वृत्तसंपादक धर्मराज हल्लाळे, सहाय्यक सरव्यवस्थापक रमेश तावडे, वरिष्ठ शाखा व्यवस्थापक नितीन खोत उपस्थित होते. यावेळी लातूर शहर व जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील ४२ कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला.

विशेष पोलीस उपमहानिरीक्षक तांबोळी म्हणाले, लोकमत वृत्तपत्र समूहाने सामाजिक बांधिलकी जोपासून समाजात स्थान नसलेल्या व वंचित घटकांना न्याय दिला आहे. याच भूमिकेतून हा सन्मान सोहळा आयोजित केला. कुटुंब व्यवस्थापनामध्ये महिलांचे दिव्य आहे. हे कठीण काम पुरूषांना शक्य नाही. घर, परिवार आणि समाज महिलांकडून घडत असतो. आता त्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहेत. त्यांना बळ देण्याची गरज आहे. ज्यांना संधी मिळाली त्यांनी भरारी घेतली आहे. पोलीस दलातही महिला चांगली कामगिरी बजावत आहेत. अनेक गुन्ह्यांच्या तपासात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. जे पुरूष अधिकाऱ्यांना शक्य नाही, ते त्यांनी करून दाखवले आहे. दिल्लीच्या निर्भया प्रकरणाचा तपास एका महिला अधिकाऱ्याने केला होता. या प्रकरणात त्या महिला अधिकाऱ्याची समयसुचकता फार मोलाची होती, असेही ते म्हणाले.

प्रास्ताविकात ‘लोकमत’चे वृत्तसंपादक धर्मराज हल्लाळे म्हणाले, कोरोनाकाळात डॉक्टर, पोलिसांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यात महिला डॉक्टरांचेही योगदान आहे. त्यांच्याविषयी कृतज्ञता आहे. कर्तृत्ववान महिलांच्या या सत्कार सोहळ्यातून जे मागे आहेत, त्यांना प्रेरणा मिळणार आहे. लातूरने शिक्षणातून मागासपणाचा शिक्का पुसून काढला. स्वत:च्या अस्तित्वाचा शोध घेतल्यास कुणीही मागे राहू शकत नाही. यावेळी सहाय्यक सरव्यस्थापक रमेश तावडे यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन अपर्णा गव्हाणे यांनी केले. वरिष्ठ शाखा व्यवस्थापक नितीन खोत यांनी आभार मानले.

हा तर माझ्या आईचा सन्मान : पोलीस अधीक्षक निखील पिंगळे

‘लोकमत’कडून होत असलेला कर्तृत्ववान महिलांचा सत्कार हा माझ्या घरातला कार्यक्रम आहे. हा माझ्या आईचा सन्मान सोहळा आहे. पहिल्या बॅचची पीएसआय असलेल्या माझ्या आईने मला घडवले. म्हणून मला हा कार्यक्रम आईच्या सन्मानाचा वाटतो. त्यामुळे महिलांच्या कर्तृत्वावर कौतुकाची थाप पडलीच पाहिजे, असे सांगत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निखील पिंगळे म्हणाले, महिलांनी स्वत:मधील न्यूनगंड सोडला पाहिजे. पुरूषांनी अहंकार सोडायला हवा. हा बदल ज्यादिवशी घडेल, त्यादिवशी परिवर्तन झाले, असे आपण समजू. याच परिवर्तनाची सुरूवात आपण स्वत:पासून करावी. एखादा मुलगा मुलीने माझी छेड काढली म्हणून तक्रार द्यायला येईल, तेव्हा बदल झाला असे आपण समजू, असेही ते म्हणाले.

महिलांनी स्वत:वर विश्वास ठेवावा : अभिनेत्री शिल्पा तुळसकर

माणसाच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण सोन्यासारखा असतो. त्यामुळे तो सोन्यासारखाच जगला पाहिजे. स्वत:चे अस्तित्व स्वत:च निर्माण केले पाहिजे. त्यासाठी स्वत:वर विश्वास हवा. वाचनामुळे माणूस घडतो. वाचनातून मनाचा व्यायाम होतो, असे अभिनेत्री शिल्पा तुळसकर म्हणाल्या.