शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

स्वप्नवेलीचा करुण अंत! कुटुंबासमोरच कर्ता पुरुष तेरणा नदीत गडप; २८ तासांनंतर मृतदेह हाती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 20:17 IST

आई, पत्नी आणि ५ मुलांचा आधार हरपला; तेरणा नदीकाठी कपडे धुताना घडला काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग.

सुमेध वाघमारेतेर (जि. धाराशिव) : नदीचा तो संथ प्रवाह काळजाचा शुक्रवारी ठोका चुकवणारा ठरला. संत गोरोबाकाकांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तेर नगरीत, जिथे भक्तीचा मळा फुलतो, तिथेच एका कुटुंबाचा आधार हरपला. कपडे धुण्यासाठी नदीकाठी गेलेल्या अमर लक्ष्मण देवकुळे (४०) या तरुणाचा तेरणा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. २८ तासांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आणि प्रशासकीय यंत्रणेच्या नाकर्तेपणानंतर अखेर एका खासगी यंत्रणेने अमरचा मृतदेह बाहेर काढला.

शुक्रवारची ‘ती’ दुपार देवकुळे कुटुंबासाठी घातवार ठरली. अमर आपल्या कुटुंबासह आनंदाने नदीकाठी कपडे धुण्यासाठी गेले होते. घरची कामे आटोपली आणि पाेहण्याचा मोह अनावर झाला. पोहण्यासाठी मारलेली ती एक उडी शेवटची ठरेल, असे कोणालाही वाटले नव्हते. अमर पाण्यात गडप झाला आणि काठावर असलेल्या कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली. किंकाळ्या आणि आक्रोशाने तेरणा काठ हादरून गेला. शुक्रवारी दुपारी १२ वाजल्यापासून जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची टीम घटनास्थळी दाखल झाली होती. मात्र, तासनतास उलटूनही त्यांच्या हाती काहीच लागत नव्हते. शनिवारी दुपारपर्यंत शोध सुरूच होता, पण यश मिळत नव्हते. अखेर हतबल झालेल्या प्रशासनाने तेरणा नदीचे पाणी गेटमधून सोडून दिले. मात्र, तरीही शोध लागेना. अखेर तहसीलदार मृणाल जाधव यांनी इंदापूर येथील खासगी यंत्रणेला पाचारण केले. पुण्याचे निखिल शिवतारे आणि बनारसी चव्हाण यांनी येताच अवघ्या काही वेळात अमरचा मृतदेह शोधून काढला. कोट्यवधींचा निधी खर्च होणारे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन एका मृतदेहाच्या शाेधासाठी २८ तास हतबल होते, याबद्दल संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन कुटुंबाला धीर दिला.

नशिबाचा खेळ: चार दिवसांत दोन मृत्यूदेवकुळे कुटुंबावर जणू आभाळच फाटले आहे. अवघ्या चार दिवसांपूर्वीच या कुटुंबातील एका सदस्याचे निधन झाले होते. त्या दु:खातून सावरण्यापूर्वीच कुटुंबाचा मुख्य आधार असलेला अमर काळाच्या पडद्याआड गेला. आई-वडील, पत्नी, दोन मुले आणि तीन मुली असा सात जणांचा भार ज्याच्या खांद्यावर होता, तो खांदाच आज निखळला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Tragedy Strikes: Man Drowns in River, Body Found After 28 Hours

Web Summary : Amar Devkule, 40, drowned in Terna River near Ter while washing clothes. His body was recovered after 28 hours by a private team, highlighting the inefficiency of local authorities. The family mourns this devastating loss.
टॅग्स :dharashivधाराशिवCrime Newsगुन्हेगारी