शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधानांचा उपदेश की अपयशाचा पुरावा? देश चालवणं आता तुमच्या..." राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
2
Top Marathi News LIVE Updates: PM मोदींच्या आवाहनामुळे काळजी वाढली, नेमके कशाचे संकेत?, तर्कवितर्क सुरू
3
सोन्यावर पंतप्रधानांचं वक्तव्य, बाजार उघडताच 'टाटा'चा 'हा' शेअर धडाम; रेखा झुनझुनवालांना १७०० कोटींचा झटका
4
'निवडणूक संपताच संकट आठवलं का?'; पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर अखिलेश यादव यांची टीका
5
'सौरभ' बनून मुलींना जाळ्यात ओढायचा शोएब; मोबाईलमुळे ब्लॅकमेलिंग आणि धर्मांतराचा खेळ उघड
6
Gold Silver Price Today: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीचे दर कमी झाले? जाणून घ्या लेटेस्ट दर
7
खळबळजनक! आई-वडिलांनीच दिली मुलाच्या हत्येसाठी ५,००,००० रुपयांची सुपारी
8
Jewellery Stocks Fall: पंतप्रधानांचं आवाहन आणि टायटन, सेनको, कल्याण यांना बसला फटका; लग्नसराईच्या हंगामात गोल्ड शेअर्स आपटले
9
मनालीची सफर ठरली अखेरची! चंबा-नूरपूर हायवेवर भीषण दुर्घटना; ६ जणांचा मृत्यू, ४ गंभीर
10
Trisha Krishnan: तृषा कृष्णनने लग्न का केलं नाही? बिजनेसमॅनसोबत झालेला साखरपुडा, लग्नही ठरलेलं, पण...
11
शिंदेसेनेच्या संघटनबांधणीसाठी श्रीकांत शिंदे राज्यव्यापी दौरा करणार, दोन महिन्यांत २२ जिल्हे पिंजून काढणार 
12
Rohit Pawar : "भ्रष्टाचार करू नका, आता निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा
13
‘वाह मोदीजी वाह! अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेले आज पेट्रोल, डिझेल वापरू नका म्हणून सांगताहेत’  विजय वडेट्टीवार यांचा टोला
14
थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णन गर्दीत अडकली; अभिनेत्रीच्या संयमाचं होतंय कौतुक
15
Canara Bank मध्ये ४४४ दिवसांच्या FD मध्ये २ लाख जमा केल्यास किती मिळेल व्याज, खात्यात एकूण किती रक्कम येईल?
16
कल्याण रेल्वे स्थानक की रेडलाइट एरिया ? मध्यरात्री तीन वाजेपर्यंत बेकायदा धंदे, पोलिसांचे नियंत्रण नाही
17
हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? इन्स्टावर अनफॉलो केलं, MI च्या गोटात काल रात्री असं काही घडलं
18
महामुंबई: मुंबई महापालिका निधी वाटपातील गटबाजीने भाजपमध्येच अस्वस्थता 
19
Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक
20
हंटाव्हायरसचा विळखा! ३ जणांचा मृत्यू झालेल्या क्रूझवरून भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; पुढे काय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड-बीदर महामार्गावर काळाचा घाला; कारच्या भीषण धडकेत तरुण जागीच ठार

By राजकुमार जोंधळे | Updated: May 11, 2026 07:58 IST

Latur Accident News: नांदेड-बीदर महामार्गावरील एकुर्गा राेड येथे रविवारी दुपारी भीषण अपघात घडला. भरधाव कारने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

- राजकुमार जाेंधळे 
डोंगरशेळकी (जि. लातूर)-  नांदेड-बीदर महामार्गावरील एकुर्गा राेड येथे रविवारी दुपारी भीषण अपघात घडला. भरधाव कारने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे एकुर्का रोड परिसरात शोककळा पसरली आहे. नामदेव हणमंतराव साळुंखे असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.

नामदेव हणमंतराव साळुंखे (वय ३१, रा. एकुर्का रोड, ता. उदगीर) हा तरुण रविवारी (दि.१०) दुपारी ४ वाजेच्या सुमारास दुचाकीवरून (क्र. एमएच २४ बीएस ३३६२) नांदेड-उदगीर-बीदर महामार्गावरील एकुर्का रोड परिसरातून जात होता. दरम्यान, पाठीमागून भरधाव आलेल्या कारने (क्र. एमएच २४ बीएल ००१५) त्याला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरात हाेती की, दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला, तर नामदेव साळुंखे महामार्गावर फेकला गेला. गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक आणि प्रवाशांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

या अपघाताची माहिती मिळताच वाढवणा (बु.) ठाण्याच्या पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उदगीर येथील रुग्णालयात पाठविला. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. याबाबत वाढवणा (बु.) पाेलिस ठाण्यात कारचालकाविराेधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू हाेती.

English
हिंदी सारांश
Web Title : Fatal car crash on Nanded-Bidar highway claims young man's life.

Web Summary : A speeding car fatally struck a motorcyclist, Namdev Salunkhe, on the Nanded-Bidar highway near Ekurga Road. The impact killed Salunkhe instantly. Police are investigating the accident, which disrupted traffic.
टॅग्स :NandedनांदेडAccidentअपघात