शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडीतील तिघांना अटक; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 16:55 IST

अडीच ते तीन महिन्यांपूर्वी याकतपूर रोड औसा येथे एका घराचे कुलूप तोडून चोरी झाली होती.

ठळक मुद्देसदरचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता दोन महिन्यांपासून स्थानिक गुन्हे शाखा व संबंधित पोलीस ठाण्याचे पथक परिश्रम घेत होते.

लातूर : अडीच ते तीन महिन्यांपूर्वी याकतपूर रोड औसा येथे घरफोडी तसेच लातूर येथील रिंग रोडवरील एका पेट्रोल पंपाजवळ एकाच्या खिश्यातून मोबाइल व पैसे चोरल्याच्या घटनेतील तीन आरोपींना स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

अडीच ते तीन महिन्यांपूर्वी याकतपूर रोड औसा येथे एका घराचे कुलूप तोडून चोरी झाली होती. त्यानंतर लातूर येथील रिंग रोडवर एका पेट्रोल पंपाजवळ झोपलेल्या व्यक्तीच्या खिशातून मोबाइल तसेच पैसे चोरीला गेले होते. भादा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उजनी येथेही मोबाइल चोरीला गेला होता. शिवाय, आठ-दहा दिवसांपूर्वी औसा येथे दोन घरांचे कुलूप तोडून रक्कम चोरीला गेली होती. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना आरोपींच्या मिळालेल्या माहितीद्वारे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या पथकाने अमोल ऊर्फ पप्पू भागवत शिंदे, अजय ऊर्फ दुडी सुरकास पवार, रामाचारी बिस्कीट ऊर्फ भिमन्ना पवार यांना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने लातूर येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विचारपूस केली असता घरफोडी करून रक्कम चोरली असल्याचे त्यांनी कबूल केले. त्यांच्याकडून २५ ग्रॅम सोन्याचे दागिने, दोन मोबाइल, अकराशे रुपये, असा एकूण १ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांनी सांगितले. सदर आरोपींविरुद्ध औसा, विवेकानंद चौक पोलीस ठाणे, भादा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

दोन महिने शोधसदरचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता दोन महिन्यांपासून स्थानिक गुन्हे शाखा व संबंधित पोलीस ठाण्याचे पथक परिश्रम घेत होते. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळ, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे, अंमलदार अंगद कोतवाड, रामहरी भोसले, युसुफ शेख, राम गवारे, राजेंद्र टेकाळे, हरुण लोहार, राजू मस्के, प्रकाश भोसले, नितीन कटारे, नागनाथ जांभळे आदींनी या कारवाईत परिश्रम घेतले.

टॅग्स :theftचोरीlaturलातूर