साकोळ येथील शिक्षकांनी दिला लाख रुपयांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:19 IST2021-02-10T04:19:37+5:302021-02-10T04:19:37+5:30

जिल्हा परिषद शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी बाला उपक्रमाची संकल्पना मांडली असून, त्याच्या अंमलबजावणीसाठी ग्रामस्थ, ...

Teachers in Sakol donated Rs | साकोळ येथील शिक्षकांनी दिला लाख रुपयांचा निधी

साकोळ येथील शिक्षकांनी दिला लाख रुपयांचा निधी

जिल्हा परिषद शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी बाला उपक्रमाची संकल्पना मांडली असून, त्याच्या अंमलबजावणीसाठी ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी, शिक्षकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले आहे. त्यानुसार, शिरुर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ जिल्हा परिषद हायस्कूलच्या शिक्षकांनी बाला उपक्रमाला प्रारंभ केला आहे. यासाठी वेतनातून एक लाख रुपयाचा निधी जमा केला आहे. यातून बाला उपक्रमाला आता गती मिळाली आहे. सदरील उपक्रम राबविण्यासाठी शाळा स्तरावर संगमेश्वर होनमाळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच नियोजन बैठक घेण्यात आली. बैठकीला नूतन सरपंच कमलाकर मादळे, उपसरपंच राजकुमार पाटील, मुख्याध्यापक श्रीमंत मेढे, बंडाप्पा निला, नवनाथ डोंगरे, संग्राम हवा, शरद भिक्का, शिवाजी एरंडे, विठ्ठल वाघमारे यांची उपस्थिती होती. यावेळी बाला उपक्रम राबविण्यासाठी आवश्यक मदत देण्याची हमी नूतन उपसरपंच राजकुमार पाटील यानी दिली. यावेळी उपस्थितांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान, शाळेच्या वतीने उपस्थितांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन शिरीष कोरे यांनी तर आभार राम भिक्का यानी मानले.

तालुक्यातील शाळांनी प्रेरणा घ्यावी...

शिरुर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये बाला उपक्रमाची दमदार सुरुवात करता यावी, यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी स्वतःच्या वेतनातून एक लाख रुपयांचा निधी जमा केल्याचे बैठकीत जाहीर करण्यात आले. यातून बाला उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला आहे. त्यामुळे साकोळ हायस्कूलच्या शिक्षकांप्रमाणे इतरांनी प्रेरणा घेऊन कामाला प्रारंभी करणे आवश्यक असल्याचे शिरुर अनंतपाळ येथील पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अनिल पागे म्हणाले.

Web Title: Teachers in Sakol donated Rs