सावित्रीबाई फुलेंचे विचार आत्मसात करून विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:59 IST2021-01-08T04:59:14+5:302021-01-08T04:59:14+5:30

लातूर: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका आहेत. महिलांना त्यांचा हक्‍क मिळवून देण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य खर्ची ...

Students should walk by assimilating the thoughts of Savitribai flowers | सावित्रीबाई फुलेंचे विचार आत्मसात करून विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी

सावित्रीबाई फुलेंचे विचार आत्मसात करून विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी

लातूर: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका आहेत. महिलांना त्यांचा हक्‍क मिळवून देण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातलेले आहे. त्यामुळे सध्याच्या काळातही विद्यार्थी व विद्यार्थिनीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार आत्मसात करून शैक्षणिक वाटचाल करावी, असे प्रतिपादन माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.

जेएसपीएम संस्थेच्यावतीने स्वामी विवेकानंद पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या परिसरात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जेएसपीएमचे कार्यकारी संचालक अजितसिंह पाटील कव्हेकर, संस्थेचे समन्वयक संचालक नीळकंठराव पवार, संस्थेचे उपाध्यक्ष आप्पासाहेब पाटील, प्राचार्य आर.एस.अवस्थी, प्राचार्य राजकुमार साखरे, प्राचार्य सचिदानंद जोशी, प्राचार्य जगपाल काळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी आ.कव्हेकर म्हणाले, ‘‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी १८४८ साली पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. महात्मा जोतिबा फुले यांच्या मदतीने हे कार्य पुढे चालु ठेवून महिलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्याचे कामही त्यांनी केेलेले आहे.’’ यावेळी संस्थेतील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Students should walk by assimilating the thoughts of Savitribai flowers