शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अहमदपूरात ४५ दिवसाआड येते नळाला पाणी; सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी दोन नगरसेवकांचे शोले स्टाईल आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2021 19:07 IST

जलवाहिनी व अन्य कामांचा दर्जा कमी असून सातत्याने गळती लागत आहे.

अहमदपूर (जि. लातूर) : शहरातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करावा तसेच मुलभूत सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी करीत येथील दोघा नगरसेवकांनी नांदेड रोडवरील पाण्याच्या टाकीवर जाऊन मंगळवारी शोले स्टाईल आंदोलन केले.

अहमदपूर शहरात ४५ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. घनकचरा व्यवस्थापनात अडचणी आहेत. काही घंटागाड्या बंद आहेत. संबंधित गुत्तेदार वेळेवर काम करीत नाही. पाणीपुरवठ्याची जलवाहिनी तयार झाली. पण शहरात लिंबोटी पाणी येण्यासाठी १९ दिवसांचा कालावधी लागला. जलवाहिनी व अन्य कामांचा दर्जा कमी असून सातत्याने गळती लागत आहे. विविध प्रभागातील काँक्रिटचे रस्ते फोडून जलवाहिनी टाकण्यात आली. पण ते खड्डे व्यवस्थित बुजविले नाहीत, अशा समस्या उपस्थित करुन नगरसेवक संदीप चौधरी व रवी महाजन यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार २६ जानेवारी रोजी या नगरसेवकांनी नांदेड रोडवरील १५ मीटर उंचीच्या टाकीवर जाऊन शोले स्टाईल आंदोलन केले.

लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागेमंगळवारी सकाळी ९ वा. नगरसेवक संदीप चौधरी व रवि महाजन यांनी आंदोलन सुरू केले. तेव्हा मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे, सतीश बिलापट्टे, पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला, पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील, पोकॉ. रामदास आलापुरे यांनी धाव घेऊन त्यांची समजूत काढली. संबंधित काम आठ दिवसांत पूर्ण करण्यासंबंधीचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर नगरसेवकांनी आपले आंदोलन मागे घेतले.

टॅग्स :laturलातूरagitationआंदोलनWaterपाणी