शिरूर अनंतपाळ विसर्जन बातमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:22 IST2021-09-21T04:22:15+5:302021-09-21T04:22:15+5:30

शिरूर अनंतपाळ येथील गणेश मंडळांना ऐतिहासिक, तसेच सांस्कृतिक वारसा लाभला असून, शेतकऱ्याच्या जीवनात बदल घडविण्यासाठी किसान गणेश मंडळाची ...

Shirur Anantpal Immersion News | शिरूर अनंतपाळ विसर्जन बातमी

शिरूर अनंतपाळ विसर्जन बातमी

शिरूर अनंतपाळ येथील गणेश मंडळांना ऐतिहासिक, तसेच सांस्कृतिक वारसा लाभला असून, शेतकऱ्याच्या जीवनात बदल घडविण्यासाठी किसान गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. अशाच पद्धतीने १७ गणेश मंडळ स्थापन झाले आहेत. तालुक्यात ४८ गावे असली, तरी पोलीस ठाण्यांतर्गत ६४ गावे आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप सुरूच असल्याने जास्तीतजास्त गावांत ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यात यावी, म्हणून येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंगद सुडके, मलय्या स्वामी यांनी गणेश मंडळाच्या पदाधिकारी, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष यांची बैठक घेऊन ‘एक गाव एक गणपती’साठी आवाहन केले होते. त्यामुळे ३८ गावांत ‘एक गाव एक गणपती’ची स्थापना करण्यात आली होती.

विसर्जन कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. यामध्ये दोन अधिकारी, २५ पोहेकाॅ, पोकॉ तर २९ असे ५६ अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वत्र विसर्जन शांततेत पार पडल्याचे पोलीस निरीक्षक सुडके यानी सांगितले.

Web Title: Shirur Anantpal Immersion News