आत्मविश्वास दांडगा; चार हजारांवर ज्येष्ठांनी केली कोरोनावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:14 IST2021-06-10T04:14:34+5:302021-06-10T04:14:34+5:30

लातूर: कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत मिळून जिल्ह्यात ७० वर्षांपुढील ४ हजार ८१२ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली होती. यातील ...

Self-confidence; Four thousand seniors performed on Corona | आत्मविश्वास दांडगा; चार हजारांवर ज्येष्ठांनी केली कोरोनावर

आत्मविश्वास दांडगा; चार हजारांवर ज्येष्ठांनी केली कोरोनावर

लातूर: कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत मिळून जिल्ह्यात ७० वर्षांपुढील ४ हजार ८१२ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली होती. यातील ४ हजार २५६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर ५५६ व्यक्तींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आत्मविश्वास दांडगा असल्याने ज्येष्ठ नागरिकांनी कोरोनाला चितपट करण्यात यश मिळविले आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक तीव्र होती. संसर्ग झपाट्याने वाढत होता. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत चौपट रुग्ण वाढले आहेत. मृत्यूची संख्याही पहिला लाटेपेक्षा अधिक आहे. मात्र, या लाटेत तरुणांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांनी कोरोनाचा यशस्वी सामना कोरोनाचा केला. ३१ ते ४० वयोगटांत सर्वाधिक रुग्णसंख्या आढळली होती. मृत्यूचे प्रमाण ५१ ते ६० वयोगटांत सर्वाधिक राहिले आहे.

Web Title: Self-confidence; Four thousand seniors performed on Corona